बर्थडे स्पेशल : रेखाचा पाच मिनिटांचा किस आणि अनेक बोल्ड सीन्सच्या कहाण्या

रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नईत झाला.

रेखा (Photo Credit: File Image)

बॉलीवूडची एव्हरग्रीन ब्यूटी रेखा आज 65व्या वर्षात पदार्पण करत आहे. रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नईत झाला. तिचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते तर आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती. आपल्या अदांनी आजही तरुणांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या रेखाने, आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. रेखाने हिंदीसोबतच तामिळ, तेलुगू भाषेत 180 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.

घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी रेखा शाळा मध्येच सोडून चित्रपटांकडे वळली. 1970चा सावन भादो हा रेखाचा पहिला हिंदी चित्रपट. परभाषिक असल्याने साहजिकच बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी रेखला प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र रेखाचा हा पहिलाच चित्रपट प्रचंड हिट ठरला  होता. या चित्रपटानंतर त्या काळी रेखाने तब्बल 25 चित्रपट साईन केले होते.

फार कमी लोकांना हे माहित असेल की, रेखाचा पहिला चित्रपट होता ‘अंजाना सफर’. मात्र काही कारणास्तव तो 8 वर्षानंतर प्रदर्शित झाला. या चित्रपटावेळी रेखाचे वय होते अवघे 15 वर्षे आणि तिचा नायक होता विश्वजीत चटर्जी. बॉलीवूडमध्ये रेखा नवीन होती. तिला तांत्रिक गोष्टींची तेव्हढी जाणही नव्हती. या चित्रपटामध्ये रेखाला विश्वजीत यांच्यासोबत एक इंटीमेट सीन करायचा होता. सीन सुरु झाला आणि अचानक विश्वजीत यांनी रेखाला किस करायला सुरुवात केली. या किस बाबत रेखाला काहीच कल्पना नव्हती. तब्बल 5 मिनिटानंतर दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटले. सीन उत्कृष्ट झाला म्हणून सर्व युनीटने टाळ्या वाजवल्या मात्र रेखाचे डोळे पाण्याने डबडबले होते. चित्रपटात नाव कमवायला आलेल्या रेखाला पहिल्याच चित्रपटात 25 वर्षे मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत नाईलाजाने किस करावा लागला होता.

त्यावेळी सर्वत्र या किसची चर्चा होती. आंतरराष्ट्रीय मिडीयाने देखील या किसची दखल घेतली होती.

या किस प्रकारानंतरही अनेकवेळा रेखाने चित्रपटांमध्ये बोल्ड आणि इंटीमेट सिन्स केले. काही सीन्समुळे फार वादंगही माजले मात्र तोपर्यंत रेखा एक सामर्थ्यवान अभिनेत्री झाली होती. चला तर पाहूया असे काही चित्रपट ज्यामध्ये रेखाच्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना केले होते घायाळ.

> उत्सव –

दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या उत्सवमध्ये रेखा मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटामध्ये रेखाने बोल्ड कपड्यात एक बोल्ड सीन दिला होता. हा चित्रपट फारसा चालला नाही मात्र रेखाच्या बोल्ड लूकची चर्चा सर्वत्र झाली.

> घर -

1978 सालचा चित्रपट 'घर' हा रेखाच्या करिअरमधील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटामध्ये रेखासोबत होते विनोद मेहरा. या चित्रपटामध्ये रेखाने विनोद मेहरासोबत अनके बोल्ड सीन्स दिले होते.

> खून भरी मांग -

1988 सालच्या राकेश रोशनच्या 'खून भरी मांग'ने रेखाला फारच प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटासाठी रेखाला अनेक पुरस्कारदेखील मिळाले. या चित्रपटामध्ये कबीर बेदीसोबत रेखाचे काही इंटीमेट सीन्स होते.

> खिलाड़ियों का खिलाड़ी -

उमेश मेहराचा खिलाड़ियों का खिलाड़ी हा चित्रपट अक्षय कुमार आणि रेखाचा एक हिट चित्रपट ठरला. या चित्रपटामध्ये रेखा आणि अक्षयचे अनके बोल्ड सिन्स होते. याच चित्रपटानंतर रेखा आणि अक्षयच्या अफेअर्सची चर्चाही सुरु झाली.

> आस्था –

बोल्ड सीन्ससाठी लोकप्रिय असलेल्या चित्रपटांमध्ये बासू भट्टाचार्य यांच्या ‘आस्था : इन द प्रिजन ऑफ स्प्रिंग’चेही नाव घेतले जाते. या चित्रपटामध्ये रेखासोबत ओम पुरी आणि नवीन निश्चल होते. चित्रपटाच्या पोस्टर्स वरूनच तुम्ही चित्रपटामधील बोल्ड सीन्सचा अंदाज लावू शकता. रेखाने ओम पुरी आणि नवीन निश्चल यांसोबत बोल्ड सीन्स दिले होते.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif