'83' च्या शूटिंग दरम्यान रणवीर सिंह झाला भावुक; अश्रूंचा बांध फुटला; दिग्दर्शकानेच केली पोल खोल

भारतीय संघाच्या विश्वविजेतेपदाचा प्रवास उलगडणाऱ्या या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं आहे. या दरम्यान चित्रपटाचा शेवटचा प्रसंग चित्रित करताना रणवीर सिंगला मात्र अश्रू अनावर झाले.

Ranveer Singh as Kapil Dev | (Picture Credit: Instagram)

विभिन्न आणि आव्हानात्मक भूमिका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रणवीर सिंहचा (Ranveer Singh) 83  हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. भारतीय संघाच्या विश्वविजेतेपदाचा प्रवास उलगडणाऱ्या या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं आहे. या दरम्यान चित्रपटाचा शेवटचा प्रसंग चित्रित करताना रणवीर सिंगला मात्र अश्रू अनावर झाले.

झालं असं की विश्वचषक स्वीकारतानाच्या प्रसंगात रणवीरच्या हातांत विश्वचषकाची प्रतिकृती न देता 1983 साली जिंकलेला खरा विश्वकरंडक देण्यात आला. त्यामुळे भारावून गेलेला रणवीर चित्रीकरण संपल्यानंतर भावुक झाला आणि त्याला गहिवरून आलं. चित्रपटाचा दिग्दर्शक (Kabir Khan)कबीर खाननेच ही माहिती दिली आहे.

चित्रीकरणाच्या अनुभवाबाबत कबीर खान म्हणाला, 'तो अनुभव अविस्मरणीय होता. आम्ही तब्बल 5 दिवस लॉर्ड्समध्ये (Lord's) चित्रीकरण केलं. फक्त सभासदांनाच परवानगी असणाऱ्या स्टेडियम मधल्या त्या प्रसिद्ध रूम मध्ये आम्ही चित्रीकरण केलं आणि जेव्हा आम्ही कपिल देव यांनी विश्वचषक उंचावलेल्या त्या प्रसिद्ध बालकनीमध्ये गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला चक्क खरा करंडक आणून दिला.'

1983 कपिल देव यांनी जिंकलेल्या विश्वचषकाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटामध्ये रणवीर आणि दीपिका लग्नानंतर प्रथमच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या आधी त्यांनी पद्मावत या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) ताहीर राज भसीन, अमृता पुरी, साकिब सलीम, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे हे सहाय्यक कलाकार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif