Dhoom 4: श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना घालणार भुरळ; TJMM नंतर 'धूम 4' मध्ये दिसणार एकत्र - रिपोर्ट
बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर थिरकण्यासाठी सज्ज झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तू झूठी मैं मक्कारनंतर दोन्ही कलाकार 'धूम 4' मध्ये एकत्र दिसणार आहेत.
Dhoom 4: बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धूमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कलाकार लवकरच 'धूम 4' (Dhoom 4)मध्ये एकत्र दिसणार आहेत. रणबीर कपूर (Ranbir Kapoor)लीड रोल मध्ये असणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) 'धूम 4'मध्ये असणार असल्याची माहिती आहे. त्यामुले श्रद्धआ आणि रणविरच्या चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 'धूम' चित्रपटाची मालिका ही बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी ॲक्शन फ्रँचायझींपैकी एक आहे. त्याच्या चौथ्या भाग येत आहे. (हेही वाचा: PM Narendra Modi नंतर Priyanka Chopra ला Shraddha Kapoor ने मागे टाकलं; ठरली भरतातली सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेली अभिनेत्री)
यशराज बॅनरची धूम ही फ्रॅंचायझी यशस्वी ठरलेली आहे. आतापर्यंत त्याचे तीन भाग आले आणि ते यशस्वीही झाले आहेत. ‘ॲनिमल’च्या सुपर सक्सेसनंतर ‘धूम 4’मध्ये रणबीर कपूरची एन्ट्री उत्सुकता वाढवणारी आहे. आता यात श्रद्धा कपूर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात त्यांची जोडी प्रेक्षकांना भावली.
तथापि, निर्मात्यांनी अद्याप ही बातमी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, रणबीर कपूरच्या मिठीत असून कॅप्शनमध्ये ‘धूम 4’ असे लिहिले आहे. ही ॲक्शन सीरिज सध्या प्री-प्रॉडक्शन स्टेजमध्ये आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. धूमच्या चौथ्या फ्रँचायझीचे शीर्षक ‘धूम रीलोडेड’ असेल, असेही सांगितले जात आहे; परंतु अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शूटिंगबद्दल बोलायचे झाले, तर ‘धूम 4’चे शूटिंग 2025 च्या शेवटी किंवा 2026च्या सुरुवातीला सुरू होणार असल्याचे कळते.
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2024 06:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

