Ramayan Movie: केजीएफ स्टार यशने 'रामायण' चित्रपटातील रावणाची भूमिका नाकारली; मिळणार होते 'इतके' मानधन

चित्रपटाबाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य अभिनेता यशला रावणाच्या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्याने ती ऑफर नाकारली आहे.

photo credit -x

Yash Rejected Ramayan Movie Role: 'रामायण' चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी केजीएफ स्टार यशला ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्याने ती ऑफर नाकारल्याच समजत आहे. त्यामुळे आता चित्रपटात यश रावणाच्या भूमिकेत दिसणार नसल्याचे स्पष्ट आहे. रणबीर कपूर श्री रामाच्या भूमीकेत दिसणार असून अभिनेत्री सई पल्लवी सीतेची भूमिकेत दिसणार आहे. यशला रावणाची भूमिका साकारण्यासाठी ८० कोटींचे मानधन देण्यात येणार होते. मात्र, त्याने ही ऑफर नाकारली आहे. (हेही वाचा : संजय लील भन्साळी यांच्या ‘Heeramandi’ सीरिजचा भव्य Trailer Out )

काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक नितिश तिवारी यांनी चित्रपटाचे शुटिंग सुरु केले आहे. रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरने ट्रेनिंग देखील सुरु आहे. त्या दरम्यानचे रणबीर कपूरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे सेटवर नितेश तिवारी यांनी ‘नो फोन पॉलिसी’ लागू केली आहे. सध्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर कोणालाच फोन वापरण्याची परवानगी नाही. चित्रपटाचे शुटिंग सुरु झाले असतानाच यशने चित्रपटाची ऑफर नाकारल्यामुळे आता रावणाच्या भूमिकेत कोणता कलाकार दिसणार आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, कुंभकरणाच्या भूमिकेसाठी अभिनेता बॉबी देओलचा विचार केला जातोय. तर रावणाचा छोटा भाऊ विभीषणाच्या भूमिकेसाठी विजय सेतुपतीला ऑफर देण्यात आली आहे. नितेश तिवारी यांचा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील हा बिग बजेट चित्रपटांच्या लिस्टमध्ये हा चित्रपट आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif