पाकिस्तानी झेंड्यासोबत फोटोसेशनमुळे राखी सावंत सोशल मीडियात ट्रोल, इंस्टाग्रामवर केला खुलासा (Watch Video)
फोटो खाली मी भारतीय आहे पण सिनेमात 'धारा 370' ही भूमिका साकरत असल्याचं म्हटलं आहे.
राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या प्रोफेशनल आणि पसर्नल लाईफमधील अंदाजाबद्दल नेहमीच सोशल मीडियामध्ये चर्चेत असते. काही तासांपूर्वी राखी सावंतने पाकिस्तानच्या झेंड्यासोबतचा (Pakistani National Flag) फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर झपाट्याने व्हायरल झाला. सोबतच नेटकर्यांनी तिच्या फोटोवर उलट सुलट चर्चा करायला सुरूवात केली. अखेर राखीनेच तिच्या फोटोबद्द्ल खुलासा करण्यासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
राखी सावंतचा ट्रोल झालेला फोटो
राखी सावंत सध्या एका सिनेमाचा भाग म्हणून पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारत आहे. फोटो खाली मी भारतीय आहे पण सिनेमात 'धारा 370' ही भूमिका साकरत असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानी मुलीची भूमिका सकारताना 'जिहाद' विषयावर भाष्य करणारा सिनेमा आहे.