आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांची 100 वी जयंती; राज ठाकरेंची व्यंगचित्रातून खास आदरांजली

दि. माडगूळकर ह्यांची आज जयंती.

Ga. Di. Madgulkar | (Photo Credits- YouTube)

महाराष्ट्राचे लाडके कवी आणि गीतकार ग. दि. माडगूळकरांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. ग. दि. मांनी मराठी सोबत हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती आणि अजून बऱ्याच भाषांसाठी लेखन केला आहे. भारत सरकारने त्यांना प्रतिष्ठित असा संगीत नाटक अकादमी (१९५१) आणि पद्मश्री (१९६९) पुरस्काराने गौरवले आहे.

सुधीर फडकेंच्या गीतरामायण मधली गाणी लिहिल्यामुळे त्यांना आदराने 'आधुनिक वाल्मिकी' म्हणून संबोधले जाते. ग दि मा ह्यांची काही गाजलेली कादंबरी म्हणजे नाच रे मोरा, तुलसी रामायण आणि मिनी आहेत. त्यासोबत त्यांनी वाटेवरल्या सावल्या आणि पराचक्र हे आत्मचरित्र सुद्धा लिहिले.

ग दि मा ह्यांच्या बऱ्याच कविता चित्रपटात गाणी म्हणून आल्या. विठ्ठला तू रे वेडा कुंभार, या चिमण्यांनो परत फिरा रे, इंद्रायणी काठी देवाची आळंदी ही  त्यांची काही गाजलेली गाणी. मराठी साहित्यात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षा निम्मित मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी सुद्धा त्यांना आपल्या फेसबुक पेजवर आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या व्यंगचित्रातून त्यांनी ग दि मा ह्यांची आठवण ताजी केली आहे.

त्यांच्या जन्मशताब्दी निम्मित त्यांची काही गाजलेली गाणी

स्व. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ह्यांनी गायलेली  ही अभंगवाणी इंद्रायणी काठी

भारतरत्न लता मंगेशकर ह्यांनी गायलेलं या चिमण्यांनो परत फिरा रे

ग दि मा ह्यांचं निधन १४ डिसेंबर १९७७ ला पुण्यात झाला. प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर हे चे लहान भाऊ होते.