Sexy In My Dress Song: नोरा फतेहचं इंटरनॅशनल म्युजिक व्हिडिओ मध्ये पदार्पण, 'सेक्सी इन माय ड्रेस' लवकरच युट्यूबवर

नव्या गाण्यात नोराने स्वत: गायन केले आहे.

Nora fateh- file

Sexy In My Dress Song: अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेह (Nora Fateh) लवकरच नव्या गाण्यात पदार्पण करणार आहे. याचदरम्यान नोरा फतेह इंटरनॅशनल म्युजिक व्हिडिओ (Internatioanl Music Video) सोबत निर्माती म्हणून काम करणार आहे. नोरा फतेह हीने 'सेक्सी इन माय ड्रेस' (Sexy In My Dress) हे गाणं तयार करण्याचं निर्णय घेतला आहे. नुकतेच नोराने सोशल मीडियावर ह्या गाण्या संबंधीत पोस्ट शेअर केला आहे. लवकरच हे गाण युट्यूब वर प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर नोरा फतेहचा चाहता वर्ग खुप आहे. आपल्या वेगवेगळ्या भुमिकेतून नोरा चाहत्यांचे मनोरंजन करते. कधी डान्स तर कधी अभिनय करून चाहत्यांच्या मनात राज्य करत आहे.

सोशल मीडियावर नव्या गाण्या संंबंधी पोस्ट टाकली आणि त्याच दरम्यान चाहत्यांच्या हे गाण बघण्याची मनात उस्तुकता निर्माण झाली. अनेक चाहत्यांनी ह्या पोस्टवर लाईक आणि कंमेट केले आहे. एका चाहत्यानी कंमेटमध्ये "खरी जागतिक कलाकर" म्हणून संबोधले आहे.

'सेक्सी इन माय ड्रेस' ह्या गाण्यात तिने स्वत: गायन केल्याचे सांगितले आहे. चाहत्यांना हे गाणं बघण्याची मनी उरउरी लागली आहे. याबाबत माहिती देताना तीने सांगितले की ह्या गाण्यासाठी पहिल्यांदा मी गायन केले आहे. माझ्या नवीन करियची सुरुवात करताना मला फार आंनद होतोय. माझे सहकारी माझ्या सोबत आहेत. ह्या गाण्याच्या शुटींग आणि निर्मातेचा चांगला अनुभव लाभला आहे. मला सर्वांनाच ह्या गाण्यावर नाचताना पाहयच आहे. ह्यासाठी मी खुप उत्सुक आहे.