Priyanka Nick Wedding : नववधूप्रमाणे सजले आहे प्रियंकाचे घर; असा असेल लग्नाचा कार्यक्रम
हे घर अगदी एका नव्या नवरीसारखे सुंदर दिसत आहे
Priyanka Nick Wedding : लवकरच राजस्थानच्या जोधपुर येथे प्रियंका चोप्रा आणि निक जोनस विवाहबंधनात अडकणार आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार 2 आणि 3 डिसेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार आहे. 2 डिसेंबरला हिंदू रिवाजाप्रमाणे तर 3 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने हे लग्न होणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियंकाच्या लग्नाची तयारी फार जोरात सुरु आहे. प्रियंकाचे मुंबई येथील घराला दिव्यांच्या माळांनी सजवले आहे. हे घर अगदी एका नव्या नवरीसारखे सुंदर दिसत आहे. जोधपुरच्या उमैद भवन येथे त्यांचा हा शाही विवाह पार पडणार आहे. हा पॅलेसदेखील सुंदररित्या सजवण्यात आला आहे.
विवाहसोहळ्यासाठी उमैद भवनवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईची वैशिष्ठ्य म्हणजे ही संपूर्ण रोषणाई 3 डी (3D) स्वरूपातील आहे.
प्रियंकाच्या मुंबई येथील बंगल्यावरही खास रोषणाई करण्यात आली आहे. तिच्या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ग्रँड एंट्री -
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंकाने आपल्या लग्नासाठी एक हेलिकॉप्टर बुक केले आहे. 29 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबरसाठी हे हेलिकॉप्टर वापरण्यात येईल. प्रियंका उदयपुरमधून चॉपरमध्ये बसून जोधपुरच्या उमैद पॅलेसमध्ये 29 नोव्हेंबरला एंट्री करणार आहे. ती 3 डिसेंबरला परत उमेद पॅलेसहून उदयपुर परतणार आहे. पाहुण्यांना नेण्यासाठी हेच हेलिकॉप्टर वापरण्यात येणार आहे.
लग्नातील कार्यक्रम -
प्रियंका आणि निकचा संगीत आणि मेहंदी समारंभ 29 नोव्हेंबला होणार आहे. 30 नोव्हेंबरला कॉकटेल पार्टी होणार आहे आणि 1 डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम पार पडेल. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे 2 डिसेंबरला आणि ख्रिश्चन पध्दतीने 3 डिसेंबरला लग्न होणार आहे.