प्रिया प्रकाश वारियर हिचा हटके लिपलॉक व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
आपल्या दिलखेचक अदांनी अवघ्या तरुणाईला वेडं लावणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिचा एक नवा लिपलॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.
आपल्या दिलखेचक अदांनी अवघ्या तरुणाईला वेडं लावणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिचा एक नवा लिपलॉक व्हिडिओ (Lip Lock Video) सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. प्रियाच्या एका लूकसाठी आतूर असलेल्या तिच्या सर्व चाहत्यांच्या हा व्हिडिओ नक्कीच पसंतीस पडेल.
या व्हिडिओत प्रिया प्रकाश आणि सिनु सिद्धार्थ रोमँटीक होताना दिसत आहेत. सुरुवातीला दोघंही एकमेकांकडे पाहून हसतात, काहीसे लाजतात आणि नंतर एकमेकांना किस करायला जातात आणि मग काय होतं? तुम्हीच पहा.
पहा व्हिडिओ:
हा व्हिडिओ आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून सध्या सोशल मीडियात त्याची भलतीच चर्चा आहे. ('श्रीदेवी बंगलो' चित्रपटाचा टीझर लॉन्च)
सिनू सिद्धार्थ एक सिनेमेटाग्राफर आहे. तर 'ओरू अदार लव' या सिनेमातील व्हिडिओमुळे चर्चेत आलेली प्रिया लवकरच 'श्रीदेवी बंगलो' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही सिनेमात प्रिया आणि सिनू यांनी एकत्र काम केले आहे. ('श्रीदेवी बंगलो' टीझर वादाच्या भोवऱ्यात, बोनी कपूर यांच्याकडून दिग्दर्शकांना नोटीस)
'ओरू अदार लव' या सिनेमातील एका व्हिडिओने प्रियाला एका रात्रीत स्टार केले. त्यानंतर तिचे फॅन फोलोईंग इतके वाढले की, ती जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स ठरली. सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असलेल्या प्रियाच्या अनेक फोटोज, व्हिडिओजवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.