पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वडिलांचे आणि खानदानाचे जन्म प्रमाणपत्र दाखवावे नंतर आमच्याकडे मागणी करावी- अनुराग कश्यप

नागरिकत्व दुरूस्ती कायदाविरोधात (Citizenship Amended Act) सातत्याने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे

Narendra Modi And Anurag Kashyap (Photo Crtedit:PTI and IANS)

नागरिकत्व दुरूस्ती कायदाविरोधात (Citizenship Amended Act) सातत्याने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यातच नागरिक दुरूस्ती कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे. यावरुन अनुराग कश्यपने ट्विट करून सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. “आधी मोदींनी त्यांच्या वडिलांचे आणि खानदानाचे जन्म प्रमाणपत्र दाखवावे नंतर आमच्याकडे मागणी करावी”, अशा शब्दात अनुराग कश्यपने मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याने सुरुवातीने वादाचे रूप घेतले आहे. तसेच नागरिक दुरूस्ती कायदा रद्द करावे, अशी मागणी संपूर्ण देशातून केली जात होती. दरम्यान, राजकीय नेते आणि सिनेमा कलाकार यांनीही या अंदोलनात सहभाग घेतला आहे. देशात सुधारित नागरिकत्व कायदा शुक्रवारपासून लागू करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीएए विरोधात देशभरात हिंसक आंदोलनं झाली तसंच हा कायदा मागे घेण्यासंदर्भात मागणी अनेकदा करण्यात आली. पण अखेर मोदी सरकारने हा कायदा देशात लागू केला आहे. यावरून बॉलिवूड दिग्दर्शक ट्विटच्या माध्यमातून म्हणाले की, “आजपासून सीएए कायदा लागू झाला. मोदींना म्हणावे पहिले तुमचे कागदपत्र, entire political science ची पदवी दाखवा. तसेच वडिलांचे आणि खानदानाचे जन्म प्रमाणपत्र सगळ्या हिंदुस्थानाला दाखवा, नंतर आमच्याकडे मागणी करा”, अशी टीका अनुराग कश्यपने ट्विटरद्वारे केली आहे. हे देखील वाचा- संजय राऊत यांनी 'छपाक' आणि 'तान्हाजी' साठी दर्शवले समर्थन; भाजप गुंडगिरी करत असल्याची केली टीका

अनुराग कश्यप यांचे ट्वीट-

 

अनुराग कश्यप यांनी अनेकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. याधी त्यांनी म्हणाले होते की, भारतात नागरिक दुरूस्ती कायदा लागू झाल्याने मोठे नुकसान होणार आहे. तसेच हा कायदा लागू होऊ द्यायचा नाही, असे आवाहन त्यांनी नागरिक दुरूस्ती कायद्याच्या विरोधात अंदोलनकर्त्यांना केले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif