Bhai - Vyakti Ki Valli : पु. लं. देशपांडे यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात? पं. भिमसेन जोशी यांच्यासह गायिकेचे घराणे व्यसनी दाखवल्याच्या दृश्यावर आक्षेप

भीमसेन जोशी अशा जेष्ठ कलाकारांवर चित्रित झालेले प्रसंग अतिशय हीन दर्जाचे आहेत. यातून अशा कलाकारांविषयी चुकीची माहिती पसवारली जात आहे

भाई – व्यक्ती की वल्ली (Photo credit : Youtube)

4 जानेवारीला पु.ल.देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणून पुलंकडे पहिले जाते, यामुळे त्यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी बरीच गर्दी केली. काही अंशी लोकांना हा चित्रपट आवडलाही, मात्र यातील अनेक गोष्टी खटकल्या. वरचेवर पुलंचे सिगारेट पिणे, त्यांचे दारूचे व्यसन, बेळगावबद्दल आक्षेपार्ह वाक्य अशा अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला गेला आहे. आता या चित्रपटात गानहिरा हिराबाई बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी अशा जेष्ठ कलाकारांवर चित्रित झालेले प्रसंग अतिशय हीन दर्जाचे आहेत. यातून अशा कलाकारांविषयी चुकीची माहिती पसवारली जात आहे असे सांगून प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवावी असे आवाहन करण्यात येत आहे.

हिराबाई बडोदेकर यांचे नातू तबलावादक निशिकांत बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी तसेच हिराबाई बडोदेकर यांची नात आणि प्रसिद्ध गायिका मीना फातर्पेकर यांनी एक पत्रक जारी केले आहे. याद्वारे त्यांनी चित्रपटातील काही प्रसंगावर आक्षेप घेतला गेला आहे. तसेच अशी चुकीची माहिती पसरवणारा चित्रपट पाहू नये असे जनतेला आव्हान केले आहे.

ज्या काळात स्त्रियांना अभिजात संगीताच्या मैफलींना जाण्यासही परवानगी नाकारली जात होती त्या काळात हिराबाईंनी मैफलीच्या मध्यभागी बसून आपली कला सादर केली. अशा महान गायिकेचे घर हे दूरू मिळण्याचे ठिकाण कसे असू शकते? असा सवाल निशिकांत बडोदेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच आपल्या कलेने संगीताची, गायिकेची सेवा करणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांना अट्टल दारुडे दाखवून, त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवला जात आहे, असेही या पत्रकामध्ये म्हटले आहे.