Munjya Enters 100 Crore Box Office Club: 'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, आदित्य सरपोतदारचा बॉलिवूडमध्ये डंका
वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ने 118.51 कोटींची कमाई केली आहे.
Munjya Enters 100 Crore Box Office Club:बॉक्स ऑफिसवर कल्की 2898 एडी चित्रपटाची लाट असताना मुंज्याने एका बाजूने आपली कमाई सुरू ठेवली आहे. कमी बजेटमध्ये निर्मिती, कोणताही मोठा चेहरा नसताना मुंज्याने महिनाभराच्या आत 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. मुंज्याने 20 व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर 90 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर आता 'मुंज्या'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली. वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ने 118.51 कोटींची कमाई केली आहे. आदित्य सरपोतदार (Adiytya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Varma) यांची मुख्य भूमिका असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ने (Munjya) झोकात 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.
'मुंज्या'ने पहिल्या दिवशी 4 कोटींची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 35.3 कोटींचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या आठवड्यात ‘मुंज्या’ने 32.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता चित्रपटाच्या रिलीजला चौथा आठवडा पूर्ण करण्याआधी मुंज्याने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.
फक्त 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मुंज्या’ ने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. या चित्रपटाने 350 कोटींचे बजेट असलेली ‘बड़े मियां छोटे मिया’ आणि 200 कोटींचा बजेट असलेल्या अजय देवगणची भूमिका असलेल्या मैदान चित्रपटाला मात दिली आहे. ‘बड़े मियां छोटे मिया’ ने बॉक्स ऑफिसवर 65 कोटींची कमाई केली. तर, 'मैदान'ने 52 कोटींची कमाई केली होती.