Munawar Faruqui Detained: मुंबईत हुक्का बार वर पोलिसांची छापेमारी; मुनव्वर फारूकी सह 13 जणांची चौकशी नंतर सुटका
मुंबई पोलिसांनी फोर्ट परिसरामध्ये अवैधस्वरूपात हुक्का पार्लर चालवला जात असल्याचं सांगत त्यावर छापेमारी करत 4400 रूपये रोकड आणि 13,500 रूपये किंमतीचे 9 हुक्का पॉट जप्त केले.
मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री एका हुक्का पार्लर (Hookah bar) वर छापेमारी करत स्टॅड अप कॉमेडियन आणि बिगबॉस फेम मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) याला ताब्यात घेतलं आहे. हुक्का पार्लर मध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची माहिती मिळताच पोलिसांनी ही छापेमारी केली होती. ताब्यात घेतलेल्यांच्या यादीमध्ये मुनव्वरचा देखील समावेश होता. COTPA, 2003 अंतर्गत फारूकीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. रिपोर्ट्सनुसार, मुनव्वर फारूकी अवैध दारू प्यायला होता.
मुंबई पोलिसांच्या जारी प्रसिद्धीपत्रामध्येही फॉर्ट परिसरामध्ये हुक्का पार्लर मध्ये रेड दरम्यान बिग बॉस 17 विजेत्या मुनव्वर फारूकी आणि अन्य 13 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र सार्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की वाचा: Munawar Faruqui: बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकीच्या अडचणीत वाढ, रॅलीत ड्रोनचा वापर केल्याप्रकरणी डोंगरी पोलिसांकडून गुन्हा दाखल .
पहा ट्वीट
पोलिसांच्या माहितीनुसार, फोर्ट परिसरामध्ये अवैधस्वरूपात हुक्का पार्लर चालवला जात होता. त्यावर छापेमारी करत 4400 रूपये रोकड आणि 13,500 रूपये किंमतीचे 9 हुक्का पॉट जप्त करण्यात आले होते. सध्या या प्रकरणामध्ये सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पाद अधिनियमांच्या अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.