IPL Auction 2025 Live

मुंबई: अभिनेत्री जायरा वसीम हिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विकास सचदेवा याला 3 वर्षाची शिक्षा

बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसीम (Zaira Wasim) हिचा विमानप्रवास करत असताना विनयभंग करणारा आरोपी विकास सचदेवा (Vikas Sachdeva) याला 3 वर्षाची सुनावणी केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसीम (Zaira Wasim) हिचा विमानप्रवास करत असताना विनयभंग करणारा आरोपी विकास सचदेवा (Vikas Sachdeva) याला 3 वर्षाची शिक्षा सुनावणी केली आहे. याप्रकरणी मुंबईच्या दिंडोशी न्यायालयाने सुनावणी केली असून पॉक्सो कायद्यातील कलम 8 आणि 354 अंतर्गत विकास याला दोषी ठरवण्यात आले आहे. जायरा वसीम 10 डिसेंबर 2017 रोजी विमानाने दिल्ली ते मुंबई असा प्रवास करत होती. दरम्यान, विकास सचदेवा याने जायराचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली होती. ही घटना घडली त्यावेळी जायरा वसीम ही 17 वर्षाची होती. याप्रकरणी जायरा वसीमने ट्वीटरवर व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. परंतु, काही दिवसानंतर आरोपीला जामीन मिळाली होती.

अभिनेत्री जायरा वसीम ही विमानातून प्रवाल करत असताना आरोपीने तिचा विनयभंग केल्याचा दावा केला होता. एवढेच नव्हेतर जायरा हिने आपल्या ट्विटरच्या खात्यावरुन यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला होता. जायरा हिने व्हिडिओ शेअर करत यात लिहले होते की, एक व्यक्तीने माझ्या अडीज तासांच्या विमानप्रवासाचा अनुभव अतिशय भयानक होता. फोनच्या माध्यमातून त्या व्यक्तीने कृत्य रेकार्ड करण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु प्रकाश कमी असल्याने त्याचे कृत्य व्यवस्थितपणे रेकार्ड होऊ शकले नाही. यामुळे केवळ आरोपीच्या पायांचाच फोटो घेऊ शकली. सुरुवातील मला काहीच कळाले नाही की तिच्यासोबत काय होत आहे. मात्र, 5-10 मिनिटानंतर कळाले की, संबंधित व्यक्ती तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत आहे. हे देखील वाचा- Lagdi Lahore Di Song in Street Dancer 3D: श्रद्धा कपूर, नोरा फतेही आणि वरुण धवन जबरदस्त डान्सचा नजराणा 'लग दी लाहोर दी' या गाण्यामधून, Watch Video

जायरा वसीन हिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या पत्नीने आपला पती बेकसूर आहे. त्याचा विनयभंग करण्याचा कोणताही हेतू नव्हता. आमच्या घरातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. जिथे माझे पती गेले होते. दरम्यान, माझे पती 24 तास झोपले नव्हते. तसेच त्याने विमानातील क्रूला म्हणाले होते की, त्यांना आवाज देऊ नये, कारण त्यांना झोपायचे होते. त्यांनी झोपताना आपले पाय वर केले होते. त्याचा विनयभंग करण्याचा कोणाताही हेतू नसल्याचे तिने म्हटले आहे.