Mr Beast ने विक्रम मोडला, T-Series ला मागे टाकून YouTube चे सर्वाधिक सबस्क्राइब असणारा चॅनल ठरला
'मिस्टर बीस्ट' उर्फ जिमी डोनाल्डसन याने YouTube वर सर्वाधिक सबस्क्रीप्शन असलेल्या चॅनलचा विक्रम स्व:तच्या नावावर नोंदवला आहे. याआधी T-Seriesचे सर्वधिक सबस्क्रायबर होते.
Mr Beast beat T-Series: 'मिस्टर बीस्ट' उर्फ जिमी डोनाल्डसन याने टी सीरिजला पिछाडीवर टाकत सर्वाधिक सबस्क्रीप्शन असलेल्या चॅनलचा विक्रम स्व:तच्या नावावर नोंदवला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे. युट्यूब (YouTube)वर सर्वाधिक सब्सक्राइब असलेले चॅनल आता 'मिस्टर बीस्ट'(Mr Beast) उर्फ जिमी डोनाल्डसन यांचा आहे. भारतीय संगीत लेबल टी-सीरीज (T-Series) ला पराभूत करून त्याने हे स्थान मिळवले आहे. (हेही वाचा: Panchayat Season 3 Streaming On Prime: 'पंचायत 3' मध्ये फुलेरा गावात सचिव ची पुन्हा एन्ट्री; ग्रामस्थ, प्रधान, विरोधकांमधील जुगलबंदीने प्रेक्षक पुन्हा खळखळूण हसणार )
हा चमत्कार कसा घडला?
2019 पासून, टी-सीरीज YouTube वर सर्वाधिक सदस्य असलेले चॅनल म्हणून राज्य करत होते. पण 26 वर्षीय 'मिस्टर बीस्ट'ने या वर्षाच्या सुरुवातीला वचन दिले होते की तो स्वीडिश YouTuber PewDiePie चा बदला घेईल, ज्याचा 2019 मध्ये T-Series ने पराभव केला होता.
आकडेवारी...
आज 'मिस्टर बीस्ट'चे YouTube वर 266 दशलक्ष सदस्य आहेत! हे T-Series च्या 233 दशलक्ष सदस्यांपेक्षा जास्त आहे. 'मिस्टर बीस्ट' त्याच्या धोकादायक आणि अनोख्या व्हिडिओंसाठी ओळखला जातो. त्यांच्या व्हिडीओमध्ये स्वत:ला जिवंत गाडण्यासारखे स्टंट किंवा '100 दिवस एकत्र राहण्याचे मोठे बक्षीस' चॅलेंजचा समावेश आहे.
त्याच्या व्हिडिओंव्यतिरिक्त, 'मिस्टर बीस्ट' ने 'बीस्ट फिलान्थ्रॉपी' नावाची एक संस्था देखील स्थापन केली आहे. ज्याद्वारे तो त्याचे कुटुंब, मित्र, चाहते गरजू लोकांना मदत करते. व्हिडिओ बनवण्यासोबतच 'मिस्टर बीस्ट'चा बिझनेसही खूप वेगाने वाढत आहे. त्यांचे 'फेस्टबल्स' नावाचे चॉकलेट उत्तर अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये विकले जात आहेत.
अलीकडेच 'मिस्टर बीस्ट'ने ॲमेझॉन प्राइमसोबत 'बीस्ट गेम्स' नावाच्या त्याच्या पहिल्या गेम शोसाठी 5000 स्पर्धकांचा शोध सुरू केला आहे. या शोमध्ये विजेत्यांना 5 मिलियन डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)