Panchayat Season 3 Streaming On Prime: 'पंचायत 3' मध्ये फुलेरा गावात सचिव ची पुन्हा एन्ट्री; ग्रामस्थ, प्रधान, विरोधकांमधील जुगलबंदीने प्रेक्षक पुन्हा खळखळूण हसणार
Photo Credit -Instagram

Panchayat Season 3 Streaming On Prime: प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा कॉमेडी ड्रामा 'पंचायत' चा तिसरा सीझन(Panchayat Season 3 ) प्राइम व्हिडिओवर (Prime Video)आला आहे. त्यामुळे फुलेरा गावात होणारी खळबळ पुन्हा एकदा सर्वांना अनुभवता येणार आहे. या सीझनमध्येही जितेंद्र कुमार म्हणजेच अभिषेक त्रिपाठी (Abhishek Tripathi)गावच्या ​​सचिव जी च्या भूमिकेत परतत आहेत. त्याच्यासोबत, नीना गुप्ता (मंजू देवी) आणि रघुबीर यादव (प्रधान जी) देखील त्यांच्या उत्कृष्ट भूमिकांमध्ये दिसणार आहेत. गेल्या हंगामात फुलेरा गावाचा विकास आणि तेथील लोकांच्या जीवनाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सचिवजींच्या व्यक्तिरेखेने शहरी आणि ग्रामीण जीवनातील फरक सुंदरपणे मांडला होता. कथानकातील सर्वच पात्रांनी त्यांच्या भुमिकेतील साधेपणा आणि विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (हेही वाचा:Panchayat 3: पंचायत 3 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; फुलेरा गावचा सचिव आणि ग्रामस्थ यांच्यातील जुगलबंदी पुन्हा रंगणार )

पहा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)