अभिनेत्री मौनी रॉय थोडक्यात बचावली; इमारतीच्या 11 व्या मजल्यावरुन गाडीवर कोसळला दगड, पाहा व्हिडिओ

इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन पडलेला दगड मौनी रॉयच्या ड्राईव्हिंग सीटपासून हातभर लांब पडला आहे. यामुळे या दुर्घटनेत ती थोडक्यात बचावली आहे

Mouni Roy ( Twitter/Instagram)

जुहू (Juhu) येथील रस्त्यावरुन गाडी घेऊन जात असताना अभिनेत्री मौनी रॉयच्या (Mouni Roy) गाडीवर दगड कोसळला आहे. इमारतीच्या 11 व्या मजल्यावरुन पडलेला दगड मौनी रॉयच्या ड्राईव्हिंग सीटपासून हातभर लांब पडला आहे. यामुळे या दुर्घटनेत ती थोडक्यात बचावली आहे. मात्र, ही घटना इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये, तसेच मुंबई मेट्रो (Mumbai Metro) बेजाबदारपणा लोकांना दाखवण्यासाठी मौनी रॉयने तिच्या ट्विटरच्या अकांउटवरुन या अपघाताचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच या समस्येचे निवारण करण्यासाठी मुंबई मेट्रोचा कोणताही अधिकारी घटनास्थळी आला नाही, असा आरोपही तिच्याकडून करण्यात आला आहे.

आज अभिनेत्री मौनी रॉयने सोशल मिडियावर मुंबई मेट्रो अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबदल तक्रार केली होती. ती कामानिमित्त घराबाहेर पडली असाताना तिच्या कारवर एक मोठा दगड कोसळला. मुंबई मेट्रोच्या साईटच्या 11 व्या मजल्यावरुन तिच्या कारवर मोठा दगड कोसळला आहे. या दुर्घटेन तिच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मौनी रॉय थोडक्यात बचावली आहे. त्यानंतर मौनीने तिच्या ट्विटर अकांउटवरुन या दुर्घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे देखील वाचा- Kumar Sanu, Alka Yagnik, Udit Narayan यांना FWICE यांच्याकडून नोटीस; अमेरिकेत पाकिस्तान च्या कार्यक्रमात परफॉर्म न करण्याचे आवाहन.

मौनी रॉयने केल्याले ट्वीट-

या दुर्घटनेच्या संदर्भात अधिक माहिती देताना मौनी म्हणाली की, गेल्या 45 मिनिटांपासून मुंबई मेट्रोच्या सुपवायझरकडे या समस्येचे निवारण करण्यासाठी थांबली आहे. परंतु, अद्याप कोणताही अधिकारी घटनास्थळी आलेला नाही. तसेच, जुहू सिग्नलवर असताना खूप उंचीवरून मोठा दगड कारवर पडला.. आणि ही घटना घडली. पण, सुदैवाने त्या ठिकाणाहून कोणी जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मुंबई मेट्रोच्या अशा बेजबाबदारपणावर कोणता उपाय करता येईल? यावर कोणी उपाय असेल तर सुचवा, असे देखील ती म्हणाली.