या सौंदर्यवती ठरल्या आहेत इंटरनेटवरील सर्वात धोकादायक सेलिब्रिटी

सेलिब्रिटींच्या नावांच्या सर्चमध्ये अनेक धोकादायक लिंक असतात आणि या लिंक तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात.

किम कर्दाशिअन (Photo Credit: Twitter)

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीपर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, इंटरनेट आणि सोशल मिडिया. सेलेब्जच्या बातम्या, त्यांची पर्सनल लाईफ, सोशल लाईफ, त्यांचे फोटो अशा सर्व घटनांचे तपशील जाणून घेण्यासाठी करोडो लोक इंटरनेटवर सेलेब्जच्या नावाचा सर्च करतात. अशा प्रकारे इंटरनेटवर लोकप्रिय ठरलेल्या सेलिब्रिटींना पुरस्कारही दिले जातात. मात्र आता तुमच्या या आवडत्या सेलेब्जच्या नावाचा सर्च पडू शकतो तुम्हाला महागात.

नुकतेच सायबर सिक्युरिटी कंपनी ‘मॅकेफी’ने सेलिब्रिटींची एक यादी जाहीर केली आहे. या यादीमधील कोणत्याही सेलेब्रिटीच्या नावाचा सर्व केल्यास ते तुम्हाला फार महागात पडू शकते असा इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे. तर या सेलिब्रिटींच्या नावांच्या सर्चमध्ये अनेक धोकादायक लिंक असतात आणि या लिंक तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात.

मॅकेफीचे मुख्य शास्त्रज्ञ राज समानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या सेलिब्रिटीची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी अथवा त्यांच्यासारखे बनण्यासाठी त्या सेलिब्रिटीच्या नावाचा सर्च खूप वेळा केला जातो. मात्र तुम्ही ओपन करत असलेल्या लिंकमुळे तुमचा डिव्हाईस खराब होऊ शकतो अथवा तुमची ओळख आणि माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळे एखादी लिंक ओपन करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे.

चला तर पाहूया कोणत्या आहेत अशा धोकादायक अभिनेत्री

किम कर्दाशिअन (Kim Kardashian)

2018 सालची इंटरनेटवर सर्च केली जाणारी सर्वात धोकादायक सेलिब्रिटी ठरली आहे किम कर्दाशिअन. आपला हॉट अंदाज आणि सेक्सी अदांसाठी किम प्रसिद्ध आहे. म्हणूनच इंटरनेटवर तिच्यासंबंधी माहिती आणि बातम्या सर्वात जास्त सर्च केल्या जातात.

कोर्टनी कर्दाशिअन (Kourtney Kardashian)

या यादीमधील दुसरे नाव आहे किमचीच बहिण कोर्टनी कर्दाशिअन हिचे. किम प्रमाणेच सेक्सी असलेल्या कोर्टनीचेही जगभरात लाखो दिवाने आहेत. मात्र आता हिचे नव इंटरनेटवर सर्च करण्याआधी काळजी घ्यावी लागणार आहे.

अॅडेल (Adele)

ब्रिटनची प्रसिध्द गायिका या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिच्या आवाजाच्या जादूमुळे जगभरातील हिचे चाहते इंटरनेटवर हिच्या नावाचा सर्च करत असतात.

कॅरोलीन फ्लेक (Caroline Fleck)

सौंदर्य नेहमी धोकादायक असते असे म्हणतात ते काही खोटे नाही, कारण कॅरोलीन फ्लेक हीसुद्धा एक धोकादायक सौंदर्यवती ठरली आहे.

रोज ब्रायन (Rose Bryan)

39 वर्षीय ऑस्ट्रेलियन अभिनेत्री रोजचे चाहते हॉलीवूडमध्येही आढळतात. मात्र तिच्या चाहत्यांना रोजचे नाव इंटरनेटवर सर्च करण्याआधी विचार करावा लागणार आहे.

ब्रिटनी स्पीयर्स (Britney Spears)

आपल्या आवाजासोबतच आपल्या रुपासाठीही प्रसिद्ध असणारी ब्रिटनी तिच्या चाहत्यांसाठी धोकादायक ठरली आहे. त्यामुळे आता इंटरनेटवर ब्रिटनीचे अपडेट्स प्राप्त करून घ्यायचे असतील थोडी काळजीही घ्यावी लागणार आहे.

त्यामुळे जर का तुम्हाला अशा व्हायरसयुक्त लिंकपासून वाचायचे असेल, किंवा तुमचे पासवर्ड अथवा इतर माहिती हॅक होऊ द्यायची नसेल तर इंटरनेटवर अशा सौंदर्यवतींच्या मागे लागणे काही काळ थांबवावे लागणार आहे. किंवा त्यांना सर्च करण्यापूर्वी विचार करा. या समस्येपासून बचाव करण्यासाठी विश्वासार्ह वेबसाईटची निवड करा. कोणत्याही माहीत नसलेल्या वेबसाईटवर क्लिक करु नका,



संबंधित बातम्या