Wedding Cha Shinema Teaser: डॉ. सलील कुलकर्णी आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत, Wedding चा शिनेमा टीझर रीलिज

सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni )दिग्दर्शित 'वेडिंगचा शिनेमा' (Wedding Cha Shinema) या सिनेमाचा पहिला टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे.

Wedding Cha Shinema (Photo Credits: Twitter and You Tube)

Wedding Cha Shinema Teaser: कवी, गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी लवकरच मराठी सिनेमा लेखक आणि दिग्दर्शक या भूमिकेत दिसणार आहे. डॉ. सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni )दिग्दर्शित 'वेडिंगचा शिनेमा' (Wedding Cha Shinema) या सिनेमाचा पहिला टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे. टीझरमध्ये कोणत्याच कलाकाराची झकल दिसत नसली तरीही एका लग्नाचं आमंत्रण तुम्हांला नक्कीच मिळतं.

अभिनेत्री मुक्ता बर्वे 'वेडिंगचा शिनेमा' या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात मुक्ता सोबत शिवाजी साटम, भाऊ कदम, रीचा इनामदार, प्रविण तरडे, सुनील बर्वे,संकर्षण कर्‍हाडे, त्यागराज खाडीलकर, प्राजक्ता हनमगर आदी कलाकार मंडळी झळकणार आहेत. 'वेडींगचा शिनेमा' हा चित्रपट 12 एप्रिल 2019 या दिवशी प्रदर्शित होणार आहे.