Vicky Velingkar Movie Teaser: सोनाली कुलकर्णी च्या ‘विक्की वेलिंगकर' सिनेमाचं टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस' म्हणत उलगडणार रहस्य (Watch Video)

या टीझर मध्ये 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस' असं म्हणत सोनाली पूर्णतः बिनधास्त अंदाजात दिसून येत आहे.

Vicky Velingkar Teaser (Photo Credits: File Image)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिचा नवा कोरा सिनेमा विक्की वेलिंगकर (Vicky Velingkar) ची पहिली झलक काही वेळापूर्वी समोर आली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी स्वतः या सिनेमाचा टीझर आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे. या टीझर मध्ये 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस' असं म्हणत सोनाली पूर्णतः बिनधास्त अंदाजात दिसून येत आहे. तर “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?,” हा प्रश्न टीझर मधून समोर ठेवण्यात आल्याने या सिनेमात काहीतरी रहस्यमय कथानक पाहायला मिळणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. अवघ्या 50 सेकेंदाच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

“विक्की वेलिंगकर’ या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शन होतेवेळी हा सिनेमा एका कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखेवर असून मुख्य नायिका ही घड्याळ विक्रेती असल्याचे सांगण्यात आले होते.या टीझर मध्ये सुद्धा एका खोलीत खूप घड्याळे दाखवत हाच संदर्भ पुढे नेण्यात आला आहे. याशिवाय काळाच्या विळख्यातून सुटण्याची स्पर्धा असे म्हणटल्याने आपोआपच सिनेमाला गूढकथेची स्वरूप प्राप्त झाले आहे.

विक्की वेलिंगकर' सिनेमाचं टीझर

सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.