अशी ही बनवाबनवी या सिनेमाबद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
तर जाणून घेऊया या सिनेमाबद्दलच्या काही खास गोष्टी...
'धनंजय माने इथेच राहतात का?, हा माझा बायको पार्वती, 'तुमचे दिलेले सत्तर रुपये वारले', अशा रंजक डायलॉग्सनी नटलेला अशी ही बनवाबनवी या सिनेमाला 30 वर्ष पूर्ण झाली. 30 वर्षांचा काळ लोटला तरी यातील संवाद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. इतकंच काय तर अगदी अजूनही हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. या सिनेमाने यशाचे अनेक टप्पे गाठले. पण 30 वर्षानंतरही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान असणाऱ्या या सिनेमाबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला माहित नसतील. तर जाणून घेऊया या सिनेमाबद्दलच्या काही खास गोष्टी...
# अशी ही बनवाबनवी हा सिनेमा 1966 साली आलेल्या हिंदी सिनेमा बिवी और मकान या सिनेमाचा रिमेक आहे. हिंदीतील बिवी और मकान हा सिनेमा ऋषीकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केला होता.
# या सिनेमावर आधारीत एका नाटकाचाही निर्मिती झाली आहे. 2009 मध्ये आलेल्या 'पेईंग गेस्ट' नाटकाचे कथानकही याच सिनेमावर आधारीत होते.
# अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बर्डे या तिन्ही अभिनेत्यांच्या पत्नींची म्हणजेच निवेदीता जोशी, सुप्रिया पिळगांवकर आणि प्रिया बर्डे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
# 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाने मराठी सिनेमात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
# सिनेमासोबतच यातील गाणीही अतिशय हिट झाली.
# मराठीतील तीन दिग्गज कलाकार अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बर्डे यांनी एकत्रित काम केलेला हा पहिला मराठी सिनेमा आहे.
# स्त्री आणि पुरुष पात्र तितक्याच ताकदीने साकारणारे अभिनेते, नाटककार बालगंधर्वंना हिंदी सिनेमा बिवी और मकान या सिनेमाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली होती. स्त्री वेषातील 'या' पुरूष कलाकारांचं रूप देखणं !
#या सिनेमानंतर अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बर्डे या त्रिकूटाने सिनेमातील तो काळ चांगलाच गाजवला.
# 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा मराठीतील सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक पाहिला गेलेला सिनेमा ठरला आहे.
# या सिनेमातील अभिनेत्री नयनतारा, अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे, सुशांत रे आणि सुधीर जोशी हे आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. शंतनूची भूमिका साकारणारा सुशांत रे हा व्ही. शांताराम यांचा नातू होता.
# अशी ही बनवाबनवी हा सिनेमा सचिन पिळगांवकर यांचा दिग्दर्शनातील पहिला सिनेमा आहे.