Thackeray Movie: 'या' कारणासाठी 'ठाकरे' सिनेमाची स्क्रिनिंग सोडून गेले दिग्दर्शक अभिजीत पानसे

शिवसेनचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट 'ठाकरे' (Thackeray) शुक्रवारी (25 जानेवारी) चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.

Thackeray Movie (Photo Credits: Twitter)

Thackeray Movie: शिवसेनचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट 'ठाकरे' (Thackeray) शुक्रवारी (25 जानेवारी) चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केले आहे. तर कथा शिवसेनानेते संजय राऊत यांनी लिहिली आहे. गुरुवारी संध्याकाळी संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी अभिजीत पानसे यांना ही स्क्रिनिंगसाठी बोलावण्यात आले होते. मात्र स्क्रिनिंग न पाहताच अभितीज पानसे निघुन गेल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

आज तक या वृत्तवाहिनेने दिलेल्या माहितीनुसार, अभिजित पानसे काही कारणामुळे स्क्रिनिंगसाठी उशिराने पोहचले. त्यामुळे पानसे यांची वाट न पाहताच स्क्रिनिंग सुरु करण्यात आली. मात्र स्क्रिनिंग सुरु करण्यामागील मुख्य कारण म्हणजे, संजय राऊत आणि अभिजित पानसे यांच्यामध्ये वाद झाले असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा-Thackeray Movie Review: धारधार संवाद, लाजवाब अभिनय आणि राजकारणाच्या पटाबाहेरील अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी 'ठाकरे' पाहाच!)

एवढच नसून सिनेमागृहाच्या स्क्रिन जवळील त्यांना बसण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे अभिजित पानसे यांनी दिग्दर्शकांना बसण्यासाठी उत्तम जागा कुठे आहे असे विचारल्यावर त्यांना योग्य सीट मिळाली नाही. एका मराठी चॅनलने याबाबत संजय राऊत यांना विचारले, तेव्हा राऊत यांनी या प्रश्नावर उत्तर दिले नाही. तर अभिजितला काही काम होते. म्हणून ते निघून गेले असे उत्तर दिले.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात ठाकरे सिनेमा हा पहाटे 4.15 वाजताचा फर्स्ट शो ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वडाळा येथील आयमॅक्सच्या बाहेर शिवसैनिकांनी खूप गर्दी केली होती.