Swapnil Joshi ने कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय! पुढील काही दिवस सोशल मिडियाचा करणार 'असा' वापर, Watch Video

त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन पुढील काही दिवस आपण सोशल मिडियावर काय करणार याची माहिती दिली आहे.

Swapnil Joshi (Photo Credits: Instagram)

भारतात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व आरोग्ययंत्रणा रात्रंदिवस एक करुन झटत आहे. दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढणे गरजेचे आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर ट्रीपचे फोटो शेअर करणाऱ्या अनेक कलाकारांवर काही सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) याने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन पुढील काही दिवस आपण सोशल मिडियावर काय करणार याची माहिती दिली आहे.

स्वप्निलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तो म्हणाला, "पुढचे काही दिवस मी सोशल मीडियावर माझे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करणार नाही. सोशल मीडियाचा वापर आपण करोनाचं युद्ध जिंकण्यासाठी करायला हवा. त्यामुळे काही दिवस एकतर मी सोशल मीडियावर सक्रिय नसेल किंवा असलो तरी त्या पोस्ट करोना संबंधित असतील. करोनाची माहिती असेल."हेदेखील वाचा- बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालदीव्स मधील फोटो शेअर करण्यावर संतापला नवाजुद्दीन सिद्दीकी, म्हणाला, 'थोडी तरी लाज बाळगा'

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝚂𝚠𝚊𝚙𝚗𝚒𝚕 𝙹𝚘𝚜𝚑𝚒 (@swwapnil_joshi)

"एखाद्याला मदत हवी असेल तर त्याचं आवाहन असेल. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मी मनोरंजनाच्या पोस्टसाठी वापरणार नाही. त्याबद्दल दिलगिरी" असं म्हणत स्वप्निलने सोशल मीडियाचा वापर कोरोनाशी लढण्यासाठी करुया असं आवाहन केलं आहे.

दरम्यान बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने देशाबाहेर मालदिव्सला (Maldives) जाऊन छान सुट्या एन्जॉय करून त्याचे सोशल मिडियावर फोटोज शेअर करुन त्याचे प्रदर्शन करणा-यांवर सडकून टीका केली आहे. 'थोडी तरी लाज बाळगा' अशा शब्दांत नवाजुद्दीनने आपला राग व्यक्त केला आहे. ‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘नवाजला सेलिब्रिटींच्या सुट्टी आणि तिथून शेअर करत असलेल्या फोटोंबद्दल विचारण्यात आले.’ तेव्हा यावर बोलताना तो म्हणाला, ‘लोकांकडे अन्न नाही आणि आपण पैसे असे व्यर्थ करत आहात. थोडी तरी लाज वाटू द्या.’