Diwali 2019: पाहा Sonalee Kulkarni चा भाऊबीज साजरा करतानाचा हा खास क्षण (See Photo Inside)
Sonalee Kulkarni (Photo Credits: Instagram)

दिवाळीच्या पाच दिवसांमधील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि औक्षण केल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. म्हणूनच हा दिवस प्रत्येक भावा- बहिणीसाठी खूपच खास असतो.

आजच्या या स्पेशल दिवशी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या फॅन्ससोबत एक खास फोटो शेअर केला आहे. तिने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर तिच्या भावासोबत एक फोटो शेअर केला आहे. तिच्या भावाचं नवं अतुल कुलकर्णी असून भावा बहिणीची हो जोडी खूपच गोड दिसत आहे.

सोनालीने साजरा केलेल्या भाऊबीजेचा हा गोड क्षण पाहा या फोटोतून...

 

View this post on Instagram

 

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 💥शुभ दीपावली 💥

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

सोनालीने हा फोटो शेअर करताना तिच्या सर्व चाहत्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोत जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. या लुकला मॅच करण्यासाठी तिने सोन्याचे पारंपरिक दागिने घातले आहेत तर एक जांभळ्या रंगाची सुंदर नाथ देखील तिच्या लुकला अधिक खुलवत आहे.

Diwali 2019: शकुंतला नरे, निखील राऊत, स्नेहलता वसईकर या मराठी सेलिब्रिटींचा पहा हटके फराळाचा पदार्थ (watch video)

सोनालीने या आधी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबतसुद्धा एक फोटो शेअर केला होता. त्यात तिचे आई, बाबा आणि तिचा भाऊ यांच्यासोबत ती पोझ देताना दिसत आहे.