स्मिता तांबे ‘लगन’ या मराठी चित्रपटात दिसणार आव्हानात्मक भूमिकेत

स्मिताचा खेडवळ लूक यामध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वत: बैलगाडी चालवली आहे. ऊसाच्या भल्यामोठया मोळया डोक्यावर घेत उन्हातान्हात शूटिंग केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांतून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

नवनवीन भूमिकांसाठी सतत आग्रही असणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe). चित्रपट, मालिका, वेबसिरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका करत आपल्या अभिनयाच्या छटा दाखवणारी ही गुणी अभिनेत्री आगामी ‘लगन’ (Lagan) या मराठी चित्रपटात आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. जी.बी.एंटरटेंन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर (Arjun Gujar) दिग्दर्शित ‘लगन’ हा मराठी चित्रपट ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधा असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. खेडयात राहणारी ऊसतोड़णी कामगाराची भूमिका स्मिताने यात साकारली आहे. करारी, कणखर तरीही सोज्वळ अशा छटा या व्यक्तिरेखेला आहेत. स्मिताचा खेडवळ लूक यामध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वत: बैलगाडी चालवली आहे. ऊसाच्या भल्यामोठया मोळया डोक्यावर घेत उन्हातान्हात शूटिंग केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांतून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

गावची जीवनपद्धत जवळून बघता आली

‘हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंददायी आणि तेवढंच आव्हानात्मक होतं. मुळात प्रत्येक स्त्री मध्ये खूप माया दडलेली असते. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडपड असते. हे पात्र साकारताना, प्रत्येक आईची ती तळमळ दाखवणं, एवढंच मी या माझ्या भूमिकेतून केलं आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने गावातील जीवनपद्धती पुन्हा एकदा जवळून बघता आली याचा ही आनंद आहे’. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना स्मिता सांगते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smita Tambe (@smitatambe)

‘लगन’ चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.

प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पहायची शक्ती देतं. प्रेमात पडणं जेवढं आनंददायी असतं तितकंच समर्थपणे प्रेम निभावणं अवघड असतं, प्रेमामुळंच नाती जोडली आणि तोडलीही जातात. अडचणींवर मात करत प्रेमाची साथ निभावणार्‍या अनोख्या प्रेमाची गोष्ट ‘लगन’ चित्रपटात ६ मे ला पहायला मिळणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now