Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2019: मराठी सिनेमातील शिवाजी महाराज यांचे पोवाडे (Watch Video)

शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं वर्णन करणारे मराठी सिनेमांमधील लोकप्रिय पोवाडे नक्की पुढच्या पिढीपर्यंतही पोहचवा.

Harshad Naybal (Photo Credits: Facebook)

 Shivaji Maharaj Jayanti 2019: 2001 सालपासून शिवाजी महाराजांची जयंती हा दिवस शासन दरबारी 19 फेब्रुवारी या दिवशी साजरी करण्याला सुरूवात झाली. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांची सत्ता उलथून लावण्यासाठी समाजात प्रबोधन करण्यासाठी, लोकांना एकत्र जमवून सण साजरा करता यावा यासाठी शिवजयंती (Shiv Jayanti) आणि गणेशोत्सव या सणांना सार्वजनिक स्वरूप दिले. आज ( 6 मे ) दिवशी तिथीनुसार शिवजयंती वैशाख शुद्ध द्वितिया दिवशी साजरी केली जात आहे. स्वातंत्र्यानंतर आजही शिवाजी महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणं गरजेचे आहे. 'पोवाडा' हा महाराष्ट्रातील एक असा सांस्कृतिक प्रकार आहे की ज्यामुळे आबालवृद्धांपर्यंत शिवाजी महाराजांचे विचार पोहचवले जातात. मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजनवर गाजलेले पोवाडे लोकप्रिय आहेत. Shivaji Jayanti 2019: शिवजयंती निमित्त शुभेच्छा WhatsApp, Facebook Status च्या माध्यमातून देणारी खास मराठी भाषेतील SMS, Wishes, Quotes, Images आणि शुभेच्छापत्रं!

हर्षद नायबळ -

अवघ्या सहा वर्षांच्या हर्षद नायबळचा पोवाडा 'सूर नवा ध्यास नवा' शो मधून घराघरात पोहचला. चिमुकल्याच्या दणदणीत आवाजातील हा पोवाडा जितका श्रवणीय आहे तितकाच तो प्रेक्षणीयदेखील आहे.

नंदेश उमप -

नंदेश उमप यांच्या घरातच महराष्ट्रातील सांस्कृतिक कलेचा वारसा आहे. त्यामुळे अनेक लाईव्ह शोजमध्ये नंदेशच्या रांगड्या अंदाजाचा आपल्याला अनुभव येतो. पण मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमातील अफजलखानाच्या वधाची कहाणी पोवाड्यातून मांडण्याची त्याची अदा विशेष गाजली.

श्रेयस तळपदे -

बघतोस काय मुजरा कर सिनेमामध्ये श्रेयस तळपदेचा शाहीरी अंदाज पहायला मिळतो.

जितेंद्र जोशी -

'बघतोस काय मुजरा कर' या सिनेमामध्ये शिवरायांचे महाराष्ट्रातील कार्य आणि विचार यांच्याकडे आपण 21 व्या शतकात कसे पाहतोय? त्यांच्या गडकिल्ल्यांची होणारी दुर्दशा यावर भाष्य करण्यात आले आहे. प्रत्येक मराठी माणसाला विचार करायला लावणार्‍या या सिनेमातील एक गाणं विशेष गाजलं आहे.

बाळकडू

उमेश कामत याने या सिनेमात एक हटके अंदाजात पोवाडा सादर केला होता.

लोककला ही देखील समाजप्रबोधन करण्यासाठी एक महत्त्वाचं माध्यम म्हणून समजलं जात असे. सिनेमातील या दमदार पोवाड्यांचा आवाज आज शिवजयंती दिवशी घुमणार आहे. पण यासोबतच महाराजांचे विचारही आपल्याला नियमित आयुष्यात उतरवणं आवाश्यक आहे.