Sarsenapati Hambirrao Teaser: शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत सरसेनापती हंबीरराव सिनेमाचा टीझर प्रदर्शित
प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असून या सिनेमा टीझर रिलीज झाला आहे. आज 6 जून, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांच्या 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असून या सिनेमा टीझर रिलीज झाला आहे. आज 6 जून, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. ट्रेलर मध्ये महाराज रुबाबत चालत येऊन सिंहासनावर आरुढ होताना दिसत आहे. आजच्या पवित्र दिवशी महाराजांचे सिंहासनाधिश्वर दर्शन प्रेक्षकांना घडण्यात आले आहे.
सिनेमाचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर टीझर शेअर केला आहे. यापूर्वी शिवजयंती 2020 चे औचित्य साधत सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. तर शिवजयंती 2021 च्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणा याचा उलघडा करण्यात आला होता. आता शिवराज्याभिषेक दिनी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. (Gashmeer Mahajani ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार; पहा त्याचं पहिलं पोस्टर)
पहा टीझर:
या ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन एल एल पी करत असून शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर प्रविण तरडे यांनी कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाचे सुत्र सांभाळले आहे. 'देऊळबंद', 'मुळशी पॅटर्न' या सिनेमांनंतर प्रविण तरडे एक नवा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. पूर्वीच्या सिनेमांचे यश पाहता नक्कीच हंबीरराव सिनेमाकडून अधिक अपेक्षा आहेत.