Dombivli Return Movie Poster : परतीचा प्रवास सुरु; 'डोंबिवली रिटर्न'चं नवं पोस्टर आऊट

डोंबिवली फास्ट या गाजलेल्या मराठी सिनेमाचा सिक्वल डोबिंवली रिटर्न प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Dombivli Return Movie Poster (Photo Credit : Twitter)

Dombivli Return Movie Poster : 'डोंबिवली फास्ट' (Dombivli Fast)  या गाजलेल्या मराठी सिनेमाचा सिक्वल 'डोंबिवली रिटर्न' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातही अभिनेता संदीप कुलकर्णी  (Sandeep Kulkarni) मुख्य भूमिकेत असून निर्मितीची धुरा देखील त्यानेच सांभाळली आहे. डोंबिवली रिटर्नचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून 'जे जातं तेच परत येतं?' अशी टॅगलाईन पोस्टरवर दिसत आहे. राजेश्वरी सचदेव आणि संदीप कुलकर्णी ही जोडी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पोस्टरवर या जोडीसह एक लहान मुलगी देखील दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भीती, अस्वस्थता असे संमिश्र भाव पाहायला मिळत आहेत.

पाहा सिनेमाचं पोस्टर...

हा परतीचा प्रवास तुम्हाला 22 फेब्रुवारीपासून सिनेमागृहांत पाहायला मिळेल. महेंद्र तेरेदेसाई (Mahendra Teredesai) यांनी या सिनेमाचं दिगदर्शन केलं आहे. यापूर्वी संदीप कुलकर्णी 'डोंबिवली फास्ट,' 'गैर,' 'ट्रॅफिक सिग्नल’, ‘अजिंक्य' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याचबरोबर 'अवंतिका,' 'गुंतता हृदय हे' अशा मालिकांमधून तो लोकप्रिय झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif