Sachin Kundalkar यांनी सोशल मीडियातून शेअर केला Pondicherry टीमचा पहिला फोटो !
वजनदार, गुलाबजाम या हटके सिनेमांचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या नवा आगामी सिनेमा असणार हे कलाकार...
वजनदार, गुलाबजाम या हटके सिनेमांचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा नवा आगामी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा चक्क स्मार्टफोनवर शूट करण्यात येणार आहे. या सिनेमाचे संपूर्ण चित्रिकरण 'पॉन्डिचेरी' (Pondicherry) येथे करण्यात येणार आहे. या सिनेमाची स्टार कास्ट जाहीर करण्यात आली असून यात सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, वैभव तत्त्ववादी. नीना कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
या कलाकारांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सचिन कुंडलकर यांनी लिहिले की, "स्क्रिप्ट सेशन माझ्या आगामी सिनेमा 'पॉन्डिचेरी'च्या स्टार कास्टसोबत." असे लिहून या कलाकारांना टॅग करण्यात आले आहे.
इतकंच नाही तर सई आणि अमृताने देखील सोशल साईट्सवर टिमसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अमृताने लिहिले की, "नवी सुरुवात, नवा सिनेमा...."
तर सईने 'नवी सुरुवात' अशी कॅप्शन देत कलाकारांसोबतचा फोटो शेअर केला.
या सिनेमाच्या निमित्ताने सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी आणि वैभव तत्त्ववादी हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
तगडी स्टारकास्ट, सचिन कुंडलकरकरांचे दिग्दर्शन आणि सिनेमाचे हटके नाव यामुळे सिनेमाविषयची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनवर शूट होणारा सिनेमा म्हणून सिनेमाविषयी अधिकच कुतुहूल निर्माण झाले आहे.