Phulwanti Movie: प्राजक्ता माळीने वाढदिवशी केली मोठी घोषणा; 'फुलवंती' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख केली जाहीर
निर्माती प्राजक्ता माळीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक लक्षवेधी मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे.
सध्या प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी तीने आपल्या नव्या चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. प्राजक्ताचा आज 35 वा वाढदिवस आहे. 'फुलवंती' चित्रपटाची निर्मिती स्वत: प्राजक्ताने केली असून या चित्रपटामध्ये ती प्रमुख भूमिकेतही दिसणार आहे. ( हेही वाचा - Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने नावात केला 'हा' बदल, इंस्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती)
अभिनेत्रीने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. निर्माती प्राजक्ता माळीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक लक्षवेधी मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या 11 ऑक्टोबर रोजी 'फुलवंती' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे करणार आहे. स्नेहल तरडे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून 'फुलवंती' चित्रपटाच्या माध्यमातून ती दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
पाहा पोस्ट -
शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये, एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि दागिने परिधान केलेली 'फुलवंती' दिमाखत बसलेली दिसत आहे. "पद्मविभूषण स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे" यांच्या 'फुलवंती' कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाबद्दल निर्मात्या प्राजक्ता माळीने सांगितले की, "गेल्या अनेक दिवसांपासून मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज तो दिवस उजाडला आहे. मी माझ्या वाढदिवशी माझ्या चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ शकले, याबद्दल मी देवाचे आभार मानते. 'फुलवंती' चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे.