Pandharinath Kamble Birthday: पंढरीनाथ कांबळे ऊर्फ Paddy चे पोट धरून हसायला लावतील 'हे' मजेशीर सीन्स, Watch Video

येड्यांची जत्रा, ही पोरगी कुणाची, खबरदार, मुन्नाभाई एसएससी, गोष्ट लग्नानंतरची, बाप रे बाप यांसारख्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले.

Pandharinath Kamble (Photo Credits: File)

Happy Pandharinath Kamble Birthday: 'कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक' या मालिकेतील 'छू' हे पात्र साकारून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा पंढरीनाथ कांबळे (Pandharinath Kamble) ऊर्फ पॅडी (Paddy) याचा आज जन्मदिवस.... मूर्ती लहान पण किर्ती महान हे पॅडीच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य.. त्याने आतापर्यंत अनेक विनोदी भूमिका केल्या. सर्वांच्या आठवणीत राहतील अशा या भूमिकांमुळे पॅडी मराठी प्रेक्षकांच्या आजही अधिराज्य करत आहे. मग तो छू असो वा हसा चकटफूमधील बंड्या.. त्याच्या प्रत्येक भूमिकेमध्ये जीव ओतून त्याने उत्तम सादरीकरण केले.

पॅडीने मराठी सिनेमांप्रमाण अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांत देखील काम केले. येड्यांची जत्रा, ही पोरगी कुणाची, खबरदार, मुन्नाभाई एसएससी, गोष्ट लग्नानंतरची, बाप रे बाप यांसारख्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले.

पाहूयात पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडी याचे हिट्स विनोदी सीन्स

हसा चकटफू

कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक

खबरदार

हे व्हिडिओज पाहून तुम्ही पोट धरून हसला असाल याची आम्हाला खात्री आहे. पॅडी रुपेरी पडद्यावर जितके काम केले त्या प्रत्येक भूमिकेतून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अशा या हरहुन्नरी, विनोदी कलाकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!