प्रियदर्शन जाधव याच्या Love Sulabh सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; 'या' कलाकारांच्या प्रमुख भूमिका

लव सुलभ असे या सिनेमाचे नाव असून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

Love Sulabh (Photo Credits: Instagram)

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) याचा एक नवा चित्रपट येऊ घातला आहे. 'लव सुलभ' (Love Sulabh) असे या सिनेमाचे नाव असून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून यात प्रियदर्शन जाधव, प्रथमेश परब (Prathamesh Parab), ईशा केसकर (Isha Keskar), मंगेश देसाई (Mangesh Desai) आणि प्रविण तरडे (Pravin Tarde) या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे प्रियदर्शन जाधव या सिनेमात लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिकेत दिसणार आहे.

ठाण्याचे महापौर नरेशजी म्हसके आणि निर्माते प्रभाकर परब यांच्या हस्ते सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. त्यानंतर ठाण्यात चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. 'लव सुलभ' सिनेमाच्या पोस्टरवर स्त्री आणि पुरुषाची आकृती दिसत आहे. त्यावर मेंहदी काढलेला एका महिलेचा हात दिसत असून कलाकारांची नावंही दिसत आहेत. सिनेमाचे नाव आणि पोस्टर ते साकारताना वापरण्यात आलेली पद्धत खास आहे. (राजीव गांधी यांच्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केल्याने अभिनेता प्रियदर्शन जाधव ट्रोल)

पहा पोस्ट: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyadarshan Jadhav (@priyadarshanjadhavv)

देवी सातेरी प्रॉडक्शन्सच्या प्रभाकर परब यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून आकाश पेंढारकर, सचिन नारकर,  विकास पवार, विशाल घाग हे सहनिर्माते आहेत. तर सिनेमाचं छायांकन विशाल गायकवाड आणि कलादिग्दर्शक सतीश चिपकर करणार आहेत.