Navra Maaza Navsaacha 2: नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच

नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. सुश्रिया चित्र निर्मिती संस्थेने "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची केली आहे.

नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. सुश्रिया चित्र निर्मिती संस्थेने "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची केली आहे. चित्रपटाची कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे. (हेही वाचा -  Navra Maza Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील पहिलं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सचिननी पोस्ट शेअर करत दिली माहिती)

पाहा टीझर -

यंदा गणपतीपुळेचा प्रवास लाल परीने नाही तर कोकण रेल्वेने होणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात सचिन-सुप्रिया यांच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री हेमल इंगळे तर जावयाच्या भूमिकेत अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.

या टीजर मधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत असून 80 कोटीचे हिरे आता 800 कोटीचे झाले आहेत. त्यामुळे हा मनोरंजक प्रवास अनुभवण्यासाठी आता प्रेक्षकांना केवळ 20 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement