'ज्यांनी हे नाटक केले, ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले'; 'नटसम्राट' बद्दलचे विधान निधनानंतर पुन्हा व्हायरल, चाहते हळहळले

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर "नटसम्राट" या नाटकाबद्दल त्यांनी केलेले एक जुने विधान समाजमाध्यमांवर पुन्हा व्हायरल झाले आहे. या व्हिडिओची चर्चा सुरू असली, तरी त्यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप जाहीर झालेले नाही.

'ज्यांनी हे नाटक केले, ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले'; 'नटसम्राट' बद्दलचे विधान निधनानंतर पुन्हा व्हायरल, चाहते हळहळले

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज गोव्यात हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मृत्यू अटळ असला तरीही नानांचे असे अचानक जाणं अजूनही त्यांच्या रसिकांना, मराठी माणसाला  स्वीकारता येण्यासारखी बाब नाही. काल मध्यरात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर पहाटे मणिपाल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कसदार अभिनेता, रूबाबदार व्यक्तिमत्त्व आणि स्पष्टवक्ता म्हणून ओळख असलेल्या नानांचे आता काही जुने व्हिडीओ वायरल होत आहेत. बोला-फूलाची गाठ पडावी अशी काही जुनी वक्तव्यं आता वास्तव बनल्याचं चित्र आहे. 'नटसम्राट' हा नाना पाटेकरांच्या कारकीर्दीमधील एक महत्त्वाचा सिनेमा आहे. सध्या 'नटसम्राट' बाबत त्यांनी केलेलं असेच एक विधान वायरल होत आहे.

व्हायरल क्लिपमध्ये पाटेकर एका कार्यक्रमात ' नटसम्राट' बाबत व्यासपीठावरून बोलत असल्याचे दिसते. "ज्यांनी हे नाटक केले, ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले" अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे.

म्हणून नटसम्राट सिनेमा केला नाटक नाही

 

View this post on Instagram

 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

नटसम्राट या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमामध्ये नाना पाटेकर हे मुख्य भूमिकेत होते. आपल्याला जेव्हा विचारणा झाली तेव्हा आपण नाटक नाही सिनेमा करू असं ते म्हणाले.  नाटक करत असताना तेवढा जीव त्यामध्ये ओतायचा म्हणजे 10,15 किंवा 25 प्रयोगांनंतर मी मेलो असतो. असे ते म्हणाले होते. दत्ता भट, श्रीराम लागू, चंद्रकांत गोखले ज्यांनी ज्यांनी नटसम्राट नाटक केलं ते हार्ट अटॅकने गेले असे नाना बोलले होते. "कारण त्याच्यामध्ये तितकं ओतल्या शिवाय आनंद देताच येणार नाही' अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. माझ्यासमोर त्यांंचा दाखला होता."

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही

पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. छातीत तीव्र वेदना जाणवल्यानंतर वैद्यकीय पथक बोलावण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूची नोंद वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण म्हणून झाली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल.

"नटसम्राट"चे मराठी रंगभूमीवरील स्थान

"नटसम्राट" हे नाटक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांनी लिहिले. निवृत्त रंगभूमी कलाकाराच्या दुःखद कौटुंबिक आयुष्याची ही कथा आहे. गणपत रामचंद्र बेलवलकर ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर हे या नाटकाचे मुख्य पात्र आहे. हे पात्र साकारणे कोणत्याही मराठी कलाकारासाठी आव्हान मानले जाते.

या नाटकावर आधारित चित्रपट १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झाला. महेश मांजरेकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले. नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आणि विश्वास जोशी यांच्यासह चित्रपटाची निर्मितीही केली. त्या वेळी तो सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला होता. विक्रम गोखले, मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे यांच्याही यात भूमिका होत्या.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

 अनेक चाहत्यांनी भावुक होत नानांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान अभिनेता रितेश देशमुख, पंतप्रधान मोदी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे.

अंत्यसंस्कार पुण्यात

नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गोव्यात मणिपाल हॉस्पिटल मध्ये नानांचे निधन झाल्यानंतर गोवा मेडिकल हॉस्पिटल मध्ये त्यांच्या पार्थिवाचे पोस्ट मार्टम केले जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव पुण्याला रवाना होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

नाना पाटेकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा मल्हार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2026 11:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).