Mumbai Pune Mumbai 3 Official Trailer : महत्त्वाकांक्षी करियर आणि पालकत्त्वाची जबाबदारी, गौतम -गौरी कसा साधणार मेळ ?

सतिश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई 3 हा सिनेमा 7 डिसेंबर 2018 रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

MPM3 Trailer Phot Credit: Youtube

Mumbai Pune Mumbai 3 Official Trailer :  स्वप्निल जोशी (Swapnil Joshi),  आणि मुक्ता बर्वे (Mukta Barve)ही सुपरहीट जोडी पुन्हा मुंबई-पुणे-मुंबई सिनेमाचा सिक्वेल घेऊन रसिकांच्या समोर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई पुणे मुंबई 3 (Mumbai Pune Mumbai 3)  या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहेत. पहिल्या भागात लग्न जमवण्याची धम्माल शक्कल, दुसर्‍या भागात लग्नाचा निर्णय आणि आता तिसर्‍या भागात पालक होण्याच्या टप्प्यावर पोहचलेले गौतम आणि गौरी या पात्रांचा रंजक प्रवास पहायला मिळणार आहे.

करियरच्या बाबतीत महत्त्वाकांक्षी असणार्‍या मुलीची लग्नानंतर आई होण्याच्या टप्प्यापर्यंत येताना तिच्या आयुष्यात होणारे बदल, कुटुंबाची, साथीदाराची साथ यावर मुंबई पुणे मुंबई 3 या सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. पालक होण्याचा हा नवा टप्पा गौतम आणि गौरी कशी पार करणार ? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. पाहा : मुंबई पुणे मुंबई 3 चा टीझर

मराठी सिनेसृष्टीत स्वप्नील आणि मुक्ता ही एक सुपरहीट जोडी आहे. या जोडीच्या खास प्रेक्षकवर्गाला 'मुंबई पुणे मुंबई 3' सिनेमाकडून विशेष अपेक्षा आहेत. नुकतचं या चित्रपटातील कुणी येणार गं हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याने युट्युबवर 1 मिलियनचा टप्पा पार केला आहे.   सिनेमामध्ये स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वेच्या सोबतीने प्रशांत दामले, सविता प्रभुणे, विजय केंकरे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.

सतिश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई 3 हा सिनेमा 7 डिसेंबर 2018 रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.