Mogra Phulaalaa Title Track: रोहित राऊत ने संगीत दिग्दर्शित केलेलं 'मोगरा फुलला' गाणं शंकर महादेवन यांच्या आवाजात रीलिज (Watch Video)

तर गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी हे गाणं गायलं आहे.

Mogra Phulaalaa (Photo Credits: Facebook)

स्वप्निल जोशीचा (Swwapnil Joshi) आगामी सिनेमा 'मोगरा फुलला'(Mogra Phulaalaa) या सिनेमाचं टायटल ट्रॅक नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. लिटील चॅम्प आणि गायक रोहित राऊत (Rohit Raut) याने या सिनेमातील 'मोगरा फुलला' शीर्षकगीताचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी हे गाणं गायलं आहे. तर अभिषेक कणकरने हे गाणं लिहलं आहे. या सिनेमात स्वप्निल जोशी प्रमुख भूमिकेत आहे. ‘मोगरा फुलला’ सिनेमाचं नवं पोस्टर; नीना कुळकर्णी - स्वप्नील जोशी 14 वर्षांनी एकत्र करणार काम

मोगरा फुलला टायटल ट्रॅक

स्वप्नील जोशी, त्याची आई नीना कुलकर्णी, सई देवधर आणि इतर कलाकारांवर चित्रीत झालेले हे गाणे जणू चित्रपटाच्या कथेचे सार सांगून जाते. मनाच्या विविध स्थिती अधोरेखित करताना, चित्रपटाचा नायक आणि यातील इतर पात्रांची नेमकी स्थिती या गाण्यातून समोर येते. विविध मानवी भावभावनांचा हिंदोळा या कथेतून हळुवार हाताळला गेला आहे, याची एक पुसटशी कल्पना या गीतातून येते. यापूर्वी मनमोहनी हे गाणं रीलिज करण्यात आलं आहे.

मोगरा फुलला हा सिनेमा येत्या 14 जूनला रीलिज होणार आहे. या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, संदिप पाठक, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.