Hirkani सिनेमाला थिएटर द्या नाहीतर... महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची थिएटर मालकांना धमकी
पण चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच एक नवा वाद सुरु झाला आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा 'हिरकणी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच एक नवा वाद सुरु झाला आहे.
हिरकणी हा चित्रपट 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे तर अक्षय कुमारचा हाऊसफुल 4 हा सिनेमा २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने अगदी मनसे स्टाईल खळखट्याकचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने हा सळसळीत इशारा दिला असून पक्षाचे कार्यकर्ते येत्या बुधवारी (ऑक्टोबर 23 ) थिएटर मालकांची भेट घेणार आहेत. ‘मराठी चित्रपटाला स्क्रीन देण्यासाठी आम्ही भांडतोय. तो आमचा हक्कच आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी आम्हाला स्क्रीन द्यावी अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामाला सामोरे जावं,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठी चित्रपटाने आपल्या उत्तम कथानकांतून अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये नाव कमावलं आहे. असं असूनही एखादा हिंदी सिनेमा आणि मराठी सिनेमा यांच्या तारखा सारख्या असल्या की थिएटर्सकडून मात्र हिंदीलाच कायम प्राधान्य दिलं जातं. या आधीही अनेक मराठी कलाकारांनीं याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.