Atul Parchure Death: अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, नाटक, मराठी-हिंदी चित्रपट, छोटा पडदा गाजवलेल्या कलाकाराच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त
जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमधील त्यांची भूमिकाही सर्वांच्या लक्षात राहणारी होती. त्यांनी केलेली पु.ल. देशपांडे यांची भूमिका ही कायमच प्रेक्षकांना लक्षात राहणारी आहे.
मराठी रंगभूमीवरचा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं निधन झालं आहे. . त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. नाटक,सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या जाण्याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा धक्का आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्नी आहेत. (हेही वाचा - Atul Parchure Passes Away: जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन; मराठी सिनेविश्वावर शोककळा )
खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आदरांजली अर्पण केली आहे.
'द कपिल शर्मा' शो या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या कार्यक्रमात त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कॅन्सर काळातील आठवणी सांगितल्या होत्या. चुकीच्या उपचारामुळे त्यांचा आजार आणखी वाढला होता असे देखील त्यांनी त्यावेळी सांगितले होते.
कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या नाटकातील अतुल परचुरे यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमधील त्यांची भूमिकाही सर्वांच्या लक्षात राहणारी होती. त्यांनी केलेली पु.ल. देशपांडे यांची भूमिका ही कायमच प्रेक्षकांना लक्षात राहणारी आहे.
दरम्यान त्यांच्या जाण्याने मराठी मधील अनेक कलाकार तसेच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेते जयवंत वाडकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, तसेच अनेक प्रेक्षकांनी आपल्या भावना सोशल मिडीयावर व्यक्त केल्या आहेत.