Mann Fakiraa Trailer: मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मन फकीरा' सिनेमाचा ट्रेलर आऊट! (Watch Video)

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लिखित व दिग्दर्शित 'मन फकीरा' हा रोमँटिक ड्रामा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mann Fakira (Photo Credits: Youtube)

Mann Fakira Trailer Out: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) लिखित व दिग्दर्शित 'मन फकीरा' (Mann Fakiraa) हा रोमँटिक ड्रामा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात सुव्रत जोशी (Suvrat Joshi), सायली संजीव (Sayali Sanjeev), अंजली पाटील (Anjali Patil) आणि अंकित मोहन (Ankit Mohan) या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. चार तरुणांची ही गोष्ट असून प्रेम, लग्न आणि नात्यातील गुंतागुत यावर सिनेमा बेतलेला आहे. यांच्या नात्यात असलेली गुंतागुत कशी सुटणार आणि नात्यांचा खरा अर्थ या चौघांनाही उगमणार का? हे आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे.

सायली संजीव आणि सुव्रत जोशी ही प्रेश जोडी पहिल्यांच्या रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. प्रेम... आहे, नाही, बहुतेक वगैरे... अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. पहा सिनेमाचा टीझर

अरेंज मॅरेज झालेलं रिया आणि भूषणचं कपल आणि लग्नाच्या पहिल्याच रात्रीत भूषणचा समोर येणारा भूतकाळ, यामुळे नात्यात निर्माण झालेली गुंतागुंत ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

मन फकीरा सिनेमाचा ट्रेलर:

हा सिनेमा 6 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैभव जोशी आणि क्षितिज पटवर्धन यांनी या सिनेमाची गाणी लिहिली आहेत. तर सौमिल शृंगारपुरे यांनी सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केले आहे.