अमृता फडणवीस यांचे तिला जगू द्या हे गाणे ऐकून 'हिला नको गाऊ द्या' असे म्हणत महेश टिळेकरांनी केली कडक शब्दांत टिका, सोशल मिडियावर केली भली मोठी पोस्ट

इतकच नव्हे तर 'गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही' असेही त्यांनी म्हटले आहे.

Amruta Fadnavis And Mahesh Tilekar (Photo Credits: Facebook)

भाऊबीजेनिमित्त अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी काल सोशल मिडियावर एक गाणे पोस्ट केले. 'तिला जगू द्या' (Tila Jagu Dya)  असं या गाण्याचे बोल असून महिलावर्गावर आधारित हे गाणे आहे. हे गाणं राज्यातील प्रत्येक भाऊरायाला समर्पित केलं आहे. हे गाणे ऐकल्यानंतर नेटक-यांकडून अमृता फडणवीसांवर जोरदार टिका होऊ लागली. अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले. यात प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी देखील 'हिला नको गाऊ द्या' असे म्हणत अमृता फडणवीसांवर टिका केली आहे. इतकच नव्हे तर 'गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही' असेही त्यांनी म्हटले आहे.

महेश टिळेकरांनी अमृता फडणवीसांवर टिका करणारे भले मोठे पोस्ट फेसबुकवर केले आहे. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? अशा कडक शब्दांत टिळेकरांनी अमृता फडणवीसांवर टिका केली आहे.

हेदेखील वाचा- Bhaubeej 2020 चं औचित्य साधत अमृता फडणवीस यांनी शेअर केले नवे गाणे; सर्व भावांकडे केली 'ही' एकच मागणी (View Post)

तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे ” आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.