ललित प्रभाकर-प्राजक्ता माळी च्या पुन्हा जुळल्या रेशीमगाठी; 'शुभ मंगलम जोडी दंगलम' ची घोषणा (Watch Promo)

जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील लोकप्रिय जोडी ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी १३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले असून, 'शुभ मंगलम जोडी दंगलम' या नव्या चित्रपटाची घोषणा त्यांनी केली आहे. हा चित्रपट १ मे २०२७ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Lalit Prabhakar and Prajakta Mali

मराठी प्रेक्षकांच्या मनावर तब्बल 13 वर्षे अधिराज्य गाजवणारी 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील लोकप्रिय जोडी ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) पुन्हा एकत्र आली आहे. 13 वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर एकत्र आलेली ही जोडी आजही लोकांच्या मनात आहे. अनेक प्रेक्षकांनी या दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आता अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. ललित आणि प्राजक्ता या दोघांनी सोशल मीडियावरून 'शुभ मंगलम जोडी दंगलम' या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून, हा चित्रपट १ मे २०२७ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याचा टीझर शेअर केला आहे.

सिनेमाची घोषणा करताना जारी टीझर व्हिडिओ मध्ये  'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील या जोडीच्या पहिल्या भेटीचा सीन पुन्हा साकारण्यात आल्याने ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांचे चाहते पुन्हा 13 वर्ष मागे गेले आहेत.

तेरा वर्षांनंतर ललित प्रभाकर-प्राजक्ता माळी पुन्हा एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Prabhakar (@lalit.prabhakar)

ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांनी 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. या जोडीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, गेली १३ वर्षे महाराष्ट्राने आपल्यावर भरभरून प्रेम केल्याचे नमूद करत, हे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेमात पाडण्यासाठी आपण परतत असल्याचे सांगितले आहे. पोस्टमध्ये 'द ओजी जोडी इज बॅक' असा उल्लेखही करण्यात आला आहे.

चित्रपटाची कथा आणि वैशिष्ट्ये

'शुभ मंगलम जोडी दंगलम' या चित्रपटाची कथा एका डेस्टिनेशन वेडिंगभोवती गुंफलेली असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रतीक पाटील करत असून, निर्मिती ज्युबिलंट फिल्म स्टुडिओज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्सच्या वतीने करण्यात येत आहे.

चित्रपटाची घोषणा करणारे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यावर १ मे २०२७ ही प्रदर्शनाची तारीख नमूद करण्यात आली आहे. #LalitPrajakta, #OGJodi, #SMJD आणि #SMJD1stMay27 या हॅशटॅगखाली ही घोषणा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

'शुभ मंगलम जोडी दंगलम' या चित्रपटाची  घोषणा सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच काही तासांतच हजारो चाहत्यांनी पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील आदित्य आणि मेघना या जोडीने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले होते, त्यामुळे या दोघांचे मोठ्या पडद्यावरील पुनरागमन चाहत्यांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरला आहे. दरम्यान प्राजक्ताने या प्रोमो शूटच्या वेळचे काही BTS फोटोजही शेअर केले आहेत.

सध्या चित्रपटाची इतर कलाकार आणि तांत्रिक टीमबाबतची सविस्तर माहिती हळूहळू समोर येत असून, प्रदर्शनाच्या तारखेपर्यंत याबाबत अधिक तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement