Kaagar Meta Review: सैराट फेम 'रिंकू राजगुरू' चा 'कागर' सिनेमा नेमका आहे तरी कसा?
रिंकू राजगुरू आणि शुभंकर तावडे या प्रमुख जोडीचा 'कागर' सिनेमा ग्रामीण कुटीर राजकारणावर भाष्य करणारा मकरंड माने दिग्दर्शित सिनेमा आहे.
'कागर' (Kagaar) या सिनेमाबद्दल अनेकांना उत्सुकता होती. सैराट फेम रिंकू राजगुरू(Rinku Rajguru) या तब्बल 3 वर्षांनंतर पुन्हा मराठी रसिकांच्या भेटीला येत असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये या सिनेमामध्ये विशेष आकर्षण होते. रिंकू सोबतच शुभंकर तावडे हा उमदा कलाकार मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार होता. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणूक प्रचार शिखरावर असताना 'राजकारणा'ची पार्श्वभूमी असणारा हा नवा सिनेमा 'कागर' कसा आहे? त्याचे हे काही रिव्ह्यूज ( नक्की वाचा: Kaagar Trailer: 'कागर' सिनेमाचा ट्रेलर आऊट; 'जुनं जाणार तेंव्हाच नवं येणार' म्हणत दमदार राजकारण्याच्या भूमिकेत 'रिंकू राजगुरू')
महाराष्ट्र टाईम्स
महाराष्ट्रच्या मते 'कागर' या सिनेमा एक सामान्य कलाकृती ठरली आहे. या सिनेमामध्ये काही त्रृटी आहेत. आमदार बनणे म्हणजे राजकारण की आजही प्रेमासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करणाऱ्याचे उदाहरण सांगणारा हा 'कागर' सिनेमा आहे याचं नेमकं उत्तर मिळत नसल्याने 'मटा'ने या सिनेमाला अडीज स्टार दिले आहेत.
Scroll.in
scroll.in च्या रिव्ह्युनुसार, कागरची नायिका रिंकू राजगुरू या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकरत आहे. या सिनेमामध्ये ती पुन्हा अंदाजात रसिकांसमोर येतेय असं सांगण्यात आलं होतं मात्र सिनेमा पाहिल्यानंतर अपेक्षित शेवट नसल्याने, कथा, दिग्दर्शनातील त्रृटीमुळे सिनेमा प्रभावी ठरण्यात कमी पडल्याचं म्हटलं आहे.
Times Now
टाईम्स नाऊच्या रिव्ह्युनुसार, 'कागर' सिनेमाकडून रसिकांना अपेक्षा होत्या मात्र 'राजकारण' आणि 'प्रेमकहाणी' यामध्ये अडकलेल्या सिनेमाकडून त्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. रेंगाळलेल्या या सिनेमातून कलाकार फार काही नवीन रसिकांसमोर आणू शकलेले नाही. टाईम्स नाऊनेदेखील सिनेमाला अडीच स्टार दिले आहेत.
लोकमत
लोकमतच्या रिव्ह्यूनुसार, रिंकू आणि शुभंकर या कलाकारांनी अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली आहे. ग्रामीण राजकारण आणि कुटीर राजकारण याच्याभोवती फिरणारा हा सिनेमा एकदा पाहण्यासारखा आहे. कागर अपेक्षित शेवट करू न शकल्याने हिरमोड होऊ शकतो. लोकमतनेही अडीच स्टार दिले आहेत.
लोकसत्ता
कागर सिनेमातील तरूण कलाकार जोडी शुभंकर तावडे आणि रिंकू राजगुरू यांचे लोकसत्तानेही कौतुक केलं आहे. अनेक वर्षांनी मराठी सिनेमामध्ये राजकारणावर आधारित सिनेमा आला आहे. कलाकारांच्या अभिनयाचे लोकसत्ताच्या रिव्ह्युमध्ये कौतुक करण्यात आलं आहे. त्यांनी सिनेमाला 3 स्टार्स दिले आहेत.
सैराट सिनेमानंतर 'आर्ची' म्हणजे रिंकू राजगुरूकडून चाहत्यांच्या सहाजिकच अपेक्षा वाढल्या आहेत. 'कागर' सिनेमामध्ये रिंकूसोबत अभिनेता शुभंकर तावडे प्रमुख भूमिकेत आहे. ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ सारखे दमदार सिनेमे देणार्या मकरंद माने यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.