Happy Birthday Ashok Saraf: 'अशी ही बनवाबनवी', 'गुपचूप गुपचूप'... पहा अशोक सराफ यांच्या सिनेमातील धम्माल विनोदी सीन्स (Watch Video)

गुपचूप गुपचूप सिनेमामधील 'मिस्टर धोंड' असेल किंवा भूताचा भाऊ मधील 'बंडू' ते बनवाबनवी मधील धनंजय माने...आजही त्यांच्या भूमिकांच्या नावाने, लोकप्रिय डायलॉग्सची त्यांच्या रसिकांच्या मनात विशेष जागा आहे.

Happy Birthday Ashok Saraf | Photo Credits: Facebook

मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणार्‍या एका हरहुन्नरी अभिनेत्यांपैकी अशोक सराफ (Ashok Saraf) हे एक. आज अभिनेते अशोक सराफ यांचा 73 वा वाढदिवस आहे. मात्र या वयातही त्यांची मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करण्याची जिद्द तरूणपिढीला प्रेरणादायी आहे. मराठी हिंदी मालिका, सिनेमांमध्ये आपल्या सहज अभिनय कौशल्याने वावरणारे अशोक सराफ विनोदसम्राट म्हणून ओळखले जातात. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ या त्रिकुटाने मराठी सिनेसृष्टीवर आपली हुकूमत गाजवली आहे. अनेक विनोदी सिनेमांमधून त्यांनी रसिकांना खळखळून हसवले देखील आहे. गुपचूप गुपचूप (Gupchup Gupchup) सिनेमामधील 'मिस्टर धोंड' असेल किंवा भूताचा भाऊ (Bhutacha Bhau) मधील 'बंडू' ते अशी ही बनवाबनवी (Ashi Hi Banvabanvi)  मधील धनंजय माने...आजही त्यांच्या भूमिकांच्या नावाने, लोकप्रिय डायलॉग्सची त्यांच्या रसिकांच्या मनात विशेष जागा आहे. Coronavirus: अशोक सराफ व निवेदिता जोशी यांनी खास आमरस-पुरी खाऊ घालून मानले पोलिसांचे आभार.

मग आज अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या धम्माल विनोदी सिनेमामधील काही सिन्सचा पुन्हा आनंद घ्या पहा त्यांचे हे खळखळून हसवणारे व्हिडिओ

अशोक सराफ यांचे धम्माल विनोदी व्हिडीओ

माझा पती करोडपती 

गंमत जंमत  

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांचे 'हे' ५ सिनेमे तुम्ही एकदा तरी पाहायलाच हवेत - Watch Video

गुपचूप गुपचूप 

अशी ही बनवाबनवी 

अशोक सराफ यांचा ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. हे नाटक वि वा शिरवाडकर यांनी लिहले आहे. त्यानंतर संगीत नाटक, मलिका, हिंदी सिनेमे, मराठी सिनेमे यामध्येही अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. आज त्यांच्या वाढदिवसादिवशी दीर्घायुष्य आणि आनंददायी वर्षाची शुभकामना करत लेटेस्टली मराठीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!