Gautami Patil New Video: गौतमी पाटील म्हणते 'अहो पाव्हणं.. चिज मी लई कडक'

या चित्रपटातील 'अहो पाव्हणं.. चीज लई कडक' (Cheez Lai Kadak) हे गाणं युट्यूबवरुन चाहत्यांच्या भेटीला आले आहे.

Gautami Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

गौतमी पाटील 'घुंगरु' (Gautami Patil Movie) चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील 'अहो पाव्हणं.. चीज लई कडक' (Cheez Lai Kadak) हे गाणं युट्यूबवरुन चाहत्यांच्या भेटीला आले आहे. तिच्या इतर गाण्यांप्रमाणेच या व्हिडिओचाही सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला पाहायला मिळतो आहे. खरे तर गौतमी पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचलेले आणि बहुतांश तरुणाईचा कलेजा खलास करणारे नाव. तिच्या अदा, डान्स, मंचावरील एकूण वातावरण भारुन टाकणे आणि त्याद्वारे उपस्थितांकडून टाळ्या, शिट्ट्या आणि प्रचंड दाद मिळवणे हे सगळेच कसे चर्चेचा विषय. तिचा डान्स, व्हिडिओ (Gautami Patil New Video Song), कार्यक्रम म्हटले की पब्लिक फूल खूश. आताही तिचा एक व्हिडिओ युट्युबवरुन चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ज्यामध्ये ती थेट पब्लीकलाच साद घालत म्हणते आहे, 'अहो पाव्हणं.. चीज लई कडक'.

'चीझ मी लई कडक'

सप्तसूर म्युझिक द्वारा युट्यूबवर अपलोकड करण्यात आलेले 'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका.. आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक' हे गाणे नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांची व्हिडिओ निर्मिती असलेले हे गाणे प्रसिद्ध गायीका वैसाली सामंत यांनी गायले आहे. तर गीतलेखण आणि संगित दिग्दर्शन विकी वाघ यांनी केले आहे. या गाण्यात गौतमी पाटील हिची झलक पाहायला मिळते. तसेच, तिच्यासोबत कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख हे देखील पाहायला मिळतात. (हेही वाचा, Gautami Patil Dances Video: 'घुंगरु' घेऊन गौतमी पाटील पडद्यावर, पण कोणासोबत? घ्या जाणून)

परफॉरमन्स दिलखेचक नाही

गौतमी पाटील हिचा सर्व गाण्यावरील परफॉरमन्स हिट असतो. लाईव्ह कार्यक्रमांमधून अनेकदा ते पाहायलाही मिळते. पण, चित्रपटातील गाण्यामध्ये परफॉर्मन्स करताना गौतमी हिस काहीशा मर्यादा आल्याचे पाहायला मिळते. 'चिज लै कडक' गाण्यातील तिचा डान्स चांगला झाला असला तरी तो लाईव्ह कार्यक्रमांइतका दिलखेचक वाटत नाही. अर्थात, चित्रिकरणादरम्यान एखाद्या परफॉरमन्स बद्दल बोलायचे तर कोणा एका कलाकाराला जबाबदार धरता येत नाही. कारण असे परफॉर्मन्स ही सामूहिक जबाबदारी असते. जसे की, दिग्दर्शक, कोरिओग्राफर, संगित, आणि कॅमेरामन यांसारख्या अनेक मंडळींनी केलेला तो सामूहिक परिपाक असतो. त्यामुळे या साखळीतील एकही कडी जरी फसली तरी त्याचा मोठा परिणाम एकूण परफॉर्मन्सवर होतो.

गौतमी पाटील व्हिडिओ

दरम्यान, गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांची तरुणाईमध्ये क्रेझ असली तरी अनेकदा पोलिसांकडून तिच्या कार्यक्रमाला विरोध होतो. खास करुन कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे प्रश्नचिन्ह उपस्थित करुन ही परवानगी नाकारल्याचे पाहायला मिळते. प्रेक्षकही तिच्या कार्यक्रमासाठी उतावीळ असतात. अनेकदा ते झाडावर चडतात, मध्येच हुल्लडबाजीही करतात.