Gashmeer Mahajani ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार; पहा त्याचं पहिलं पोस्टर
त्यानंतर त्याने देऊळबंद, वन वे तिकीट या मराठी सिनेमांमध्ये तर पानिपत या हिंदी सिनेमामध्ये काम केले आहे.
प्रविण तरडे दिग्दर्शित आगामी मराठी सिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) साकारणार आहे. या सिनेमामधील त्याच्या शिवरायांच्या भूमिकेतील पहिलं पोस्टर शिवजयंतीचं औचित्य साधत जारी करण्यात आलं आहे. 'कॅरी ऑन मराठा' या पहिल्या मराठी सिनेमातून गश्मीरचं मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण झालं आहे. त्यानंतर त्याने देऊळबंद, वन वे तिकीट या मराठी सिनेमांमध्ये तर पानिपत या हिंदी सिनेमामध्ये काम केले आहे. हॅन्डसम हंक गश्मिर हा उत्तम डांसर देखील आहे. तो ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे. सरसेनापती हंबीरराव ग्रास आर्ट पाहून अभिनेता प्रविण तरडे भारावला, शेतकरी कलाकाराला दिला 'हा' शब्द; पहा त्याची फेसबूक पोस्ट.
दरम्यान ‘सरसेनापती हंबीरराव’हा सिनेमा शिवरायांचे मावळे हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात हंबिरराव मोहित्यांची मुख्य भूमिका प्रविण तरडे रूपेरी पडद्यावर साकारणार आहेत. मराठी सिनेसृष्टीमध्ये ऐहासिकांची सिनेमांची देखील मोठी मालिका आहे. त्यामुळे शिवरायांच्या भूमिकेत यापूर्वी अनेकदा रसिकांनी डो. अमोल कोल्हे यांना पाहिलं आहे. त्यासोबतच महेश मांजरेकर, शरद केळकर यांनी महाराजांची भूमिका साकारून रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे या पंगतीमध्ये गश्मीर बसणार का? तो रूपेरी पडद्यावर महाराजांना कसा साकारतो याकडे आता मराठी रसिकांचं लक्ष लागलं आहे. Shiv Jayanti 2021: 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत शिव जयंती विशेष प्रसारित होणार 'अफजल खानाचा वध' एपिसोड.
गश्मीर महाजनी पोस्ट
संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा मराठी आगामी बिग बजेट सिनेमा आहे. मागील वर्षी तो रिलीज होणं अपेक्षित होतं पण कोरोना वायरस संकटामुळे त्याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. मागील वर्षी शिवजयंतीच्या मुहूर्तावरच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.