Dr. Shreeram Lagoo Dies: अमेय वाघ, उर्मिला मातोंडकर सह मराठी कलाकारांनी शेअर केले डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबतचे 'खास क्षण'!
श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. यामुळे मराठी सिनेसृष्टी ते नेतेमंडळींनी या घटनेचे दुख व्यक्त केले असून त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
'नटसम्राट' या मराठी नाटकातून आपल्या भुमिकेची छाप पाडणारे डॉ. श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo) यांचे मंगळवारी निधन झाले. यामुळे मराठी सिनेसृष्टी ते नेतेमंडळींनी या घटनेचे दुख व्यक्त केले असून त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. श्रीराम लागू हे प्रदीर्घ काळापासून आजारी होते आणि वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याच पार्श्वभुमीमावर मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी त्यांच्या सोबत अभुनभवलेले क्षण, त्यांच्यासोबतच्या आठवणी किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत कौतुक केले आहे.
श्रीराम लागू यांचा सातारा येथे 16 नोव्हेंबर 1927 रोजी जन्म झाला. तर, 1979 मध्ये लागू यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू म्हणजे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी यांचे एक चालतेबोलते विद्यापीठच होते. त्यांच्या जाण्यामूळे मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमी यांचे मोठे नुकसान झाल्याची भावना अनेक कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहेतसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार अमेय वाघ, उर्मिला मातोंडकर यांच्यासह अन्य कलाकारांनी श्रीराम लागू यांच्यासोबत घालवलेल्या काही खास क्षणांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.(जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाची हळहळ व्यक्त करणारे राज ठाकरे यांचे ट्वीट)
अमेय वाघ इन्स्टाग्राम पोस्ट:
उर्मिला मातोंडकर इन्स्टाग्राम पोस्ट:
सुबोध भावे इन्स्टाग्राम पोस्ट:
क्षिती जोग इन्स्टाग्राम पोस्ट:
View this post on Instagram
NATSAMRAT...🙏🙏🙏 #drshreeramlagu #shantajog
A post shared by kshitee jog (@kshiteejog) on
डॉ. श्रीराम लागू यांना अभिनय कारकीर्दीतील 'नटसम्राट' हे नाटक, 'सिंहासन', 'पिंजरा' यांसारखे मराठी सिनेमे मैलाचा दगड ठरले आहेत. डॉ.श्रीराम लागू यांनी सुमारे 4 दशकं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. त्यांनी 100 हून अधिक हिंदी सिनेमात आणि 40 पेक्षा अधिक मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे. यासोबतीने 20 हून अधिक मराठी नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्यांनी मराठी, हिंदीबरोबरच गुजराती रंगभूमीवरही काम केलं आहे. श्रीराम लागू यांनी वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरीचं शिक्षण घेतलं होतं. अभिनयासोबत परखड विचार मांडणारे विवेकवादी अभिनेते म्हणून डॉ. लागूंची ओळख होती.