Smile Please Trailer: शाहरूख खान च्या उपस्थितीत 'स्माईल प्लिज' चा ट्रेलर लॉन्च; पहा सिनेमाची उत्कंठा वाढवणारा दमदार ट्रेलर
मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर ही नवी जोडी 'स्माईल प्लिज'च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. 19 जुलैला रिलीज होणार्या सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च सोहळा शाहरूख खानच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
विक्रम फडणीस (Vikram Phadnis) दिग्दर्शित स्माईल प्लिज सिनेमाच्या टीझर आणि पहिल्या गाण्यानंतर रसिकांना या सिनेमाच्या ट्रेलरची (Smile Please Trailer) प्रतिक्षा होती. मुंबईमध्ये काल (26 जून) स्माईल प्लिज सिनेमाचा ट्रेलर बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (Shah Rukh Khan) च्या हस्ते रीलीज करण्यात आला आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) ही फ्रेश जोडी रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे मुक्ता आणि ललितच्या रसिकांमध्ये स्माईल प्लिज या सिनेमाबदाल विशेष उत्सुकता आहे. मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला! (Watch Video)
स्माईल प्लिजमध्ये मुक्ता (नंदिनी) फोटोग्राफरच्या प्रमुख भूमिकेत आहे. तर तिच्या आयुष्यात अनपेक्षित वळणावर ललितची (विराज) एंट्री होते. सिनेमामध्ये ललित आणि मुक्ताची केमेस्ट्री पहायला मिळणार आहे. या सिनेमाची खरी कहाणी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. मात्र अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये आयुष्यातील नात्यांमुळे होणारी गुंतागुंत आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येकाची असणारी धडपड दाखवण्यात आली आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून अनेकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
Smile Please ट्रेलर
मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर यांच्या सोबत स्माईल प्लिज सिनेमात आदिती गोवित्रीकर, सतिश आळेरकर, प्रसाद ओक हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 19 जुलैला रीलिज होणार आहे.