Bhaai - Vyakti Kee Valli Part 2 Trailer: पुरूषोत्तम देशपांडे, महाराष्ट्राचे 'पुलं' कसे झाले? हा प्रवास 'भाई' च्या उत्तरार्धात उलगडणार
'भाई व्यक्ती की वल्ली' या सिनेमाचा उत्तरार्ध 8 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Bhaai - Vyakti Kee Valli Part 2 Trailer: पुलं देशपांडे यांचं साहित्य तिसरी पिढी वाचत आहे. मात्र त्याची जादू आणि प्रभाव हा तसूभरही कमी झालेला नाही. 'भाई व्यक्ती की वल्ली' च्या पुर्वार्धाला समीक्षकांसोबत रसिकांनीही दाद दिली आहे. त्यामुळे उत्तरार्धामध्ये काय काय होणार ही उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. पेशाने प्राध्यापक असलेले पुरूषोत्तम देशपांडे महाराष्ट्राचे लाडके पुलं कधी आणि कसे झाले याचा रूपेरी पडद्यावरील उलगडा 'भाई व्यक्ती की वल्ली' या सिनेमाच्या उत्तरार्धामध्ये होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. Bhaai - Vyakti Kee Valli : ‘भाई’ - पु.ल.देशपांडे यांचा बायोपिक या '6' कारणांसाठी पहायलाच हवा
'भाई व्यक्ती की वल्ली' -उत्तरार्ध ट्रेलर
पु लं देशपांडे या व्यक्तीमत्त्वाचं वयाच्या तिशी पलिकडील आयुष्य सिनेमामध्ये अभिनेता विजय केंकरे या कलाकाराने साकारले आहे. या सिनेमाच्या उत्तरार्धामध्ये पुलं देशपांडेंचा सिनेमा आणि नाट्यसृष्टीमध्ये 100% प्रवेश कसा झाला. आणिबाणीच्या काळातील पुलं नी घेतलेल्या भूमिका, बाबा आमटेंच्या 'आनंदवन'साठी केलेली मदत अशा अनेक घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. Bhai - Vyakti Ki Valli : पु. लं. देशपांडे यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात? पं. भीमसेन जोशी यांच्यासह गायिकेचे घराणे व्यसनी दाखवल्याच्या दृश्यावर आक्षेप
पुलं देशपांडेंनी आपलं आत्मचरित्र कोणत्याच स्वरूपात लिहलेले नसल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा या सिनेमाच्या माध्यमातूनच होणार आहे. 'भाई व्यक्ती की वल्ली' या सिनेमाचा उत्तरार्ध 8 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.