महाराष्ट्रात Theaters Unlock ची घोषणा होताच 'दे धक्का २' ते झिम्मा, 'या' मराठी सिनेमांनी जाहीर केल्या प्रदर्शनाच्या तारखा
त्यामुळे मराठी सिनेसृष्टीमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला आहे. अनेक कलाकृतींच्या सिनेमागृहातील रिलीज डेट्स आता जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे.
महाराष्ट्रात राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच प्रार्थनास्थळांसोबतच नाट्यगृहं (Theaters) आणि सिनेमागृहांना (Cinema Halls) देखील उघडण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी सशर्त असून थिएटर चालक-मालकांना काही नियमांचं पालन करायचं आहे. दरम्यान रसिकांसाठी देखील यामध्ये कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये नाट्यगृहं, सिनेमागृह बंद करण्यात आली होती ती आता मोठ्या प्रतिक्षेनंतर पुन्हा उघडली जात आहेत. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील अनेक सिनेमे (Marathi Movies) आता रिलीजसाठी सज्ज झाले आहे.
लॉकडाऊनच्या काळात काही सिनेमांनी टेलिव्हिजन किंवा ओटीटी वर सिनेमे रीलिज करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मराठीत अनेक बिग बजेट सिनेमे प्रतिक्षेत असल्याने आता ते एकापाठोपाठ एक सिनेमागृहात रिलीज होण्यासाठी सज्ज होत आहेत.
दे धक्का 2
महेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का 2 आता थिएटर्स मध्ये 1 जानेवारी 2022 ला रिलीज होणार आहे. दे धक्का चा हा सिक्वेल आहे. दे धक्का ला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद मिळाला होता.
गोदावरी
निखिल महाजन दिगदर्शित गोदावरी सिनेमा आता 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये विक्रम गोखले ते जितेंद्र जोशी, संजय मोने, नीना कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकामध्ये दिसणार आहेत. नक्की पाहा: Godavari Teaser: जितेंद्र जोशी याच्या गोदावरी सिनेमाची पहिली झलक; पहा टीझर.
झिम्मा
हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा सिनेमा 19 नोव्हेंबर 2021 ला रिलीज होणार आहे. लंडन ट्रीप असलेल्या वयाच्या विविध टप्प्यावरील महिला आणि त्यांच्यातील धम्माल गोष्टी वर हा सिनेमा बेतलेला आहे. इथे पहा टीझर .
डार्लिंग
डार्लिंग हा सिनेमा समीर पाटील दिग्दर्शित आहे. हा 10 डिसेंबरला प्रदर्शित होईल. रितिका श्रोत्री, निखिल चव्हाण आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे.
महाराष्ट्रामध्ये मुंबईत फिल्मसिटी बरेच महिने कोरोनामुळे बंद पडली होती. याचा फटका जसा कलाकारांना बसला तसा पोटावर हात असलेल्या अनेक जणांना बसला होता. त्यामुळे तातडीने सिनेमागृहं, नाट्यगृहं सुरू करण्याची वारंवार मागणी केली जात होती. आता ती मान्य झाली असून त्यासाठीची नियमावली देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे.