Nachya Got A Girlfriend Song: अमेय वाघ आणि रसिका सुनील यांचं 'गर्लफ्रेंड' सिनेमातील पहिलं धमाकेदार गाणं (Watch Video)
उपेंद्र सिधये लिखित आणि दिग्दर्शित 'गर्लफ्रेंड' हा सिनेमा येत्या 26 जुलै 2019 दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Girlfriend Song: अमेय वाघ (Amey Wagh) आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या जोडीच्या बहुप्रतिक्षित आगामी 'गर्लफ्रेंड'(Girlfriend) या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज आज रिलिज करण्यात आलं आहे. 'Nachya Got A Girlfriend' या लाईनवरच हे गाणं सुरू होतं. जसराज जोशीच्या आवाजात हे धमाल गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. ह्र्षिकेश - सौरभ- जसराज (Hrishikesh - Saurabh - Jasraj) या त्रिकुटाने हे गाणं संगीतबद्ध केलं असून क्षितिज पटवर्धनने हे मजेशीर गाणं लिहलं आहे. अमेय वाघ च्या 'गर्लफ्रेंड' सिनेमाच्या तिसर्या टीझर मध्ये रसिका सुनील, ईशा केसकर ची झलक (Watch Video)
'Nachya Got A Girlfriend' गाणं
'गर्लफ्रेंड' सिनेमामध्ये अमेय वाघ 'नचिकेत'ची भूमिका साकारत आहे. सामान्य मुलाच्या भूमिकेत असलेला हा 'नाच्या' गर्लफ्रेंडच्या शोधात असतो. या सिनेमाचे तीन टीझर लॉन्च करण्यात आले आहेत. सई ताम्हणकर ही त्याची मुख्य नायिका दाखवण्यात आली आहे. मात्र या सिनेमाच्या गाण्यात रसिका सुनीलची झलक पहायला मिळाली आहे. गर्लफ्रेंड मिळाल्याच्या आनंदात कुटुंबासह सारेच 'नाच्या' सोबत थिरकताना दिसत आहेत.
रसिका सुनील सध्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली आहे. 'गर्लफ्रेंड' सिनेमाच्या माध्यमातून ती पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. उपेंद्र सिधये लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 26 जुलै 2019 दिवशी प्रदर्शित होणार आहे.